जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / आजी-नातीचा धम्माल डान्स; अभिनेत्री अदिती द्रविडचा हा VIDEO एकदा पाहाचं

आजी-नातीचा धम्माल डान्स; अभिनेत्री अदिती द्रविडचा हा VIDEO एकदा पाहाचं

आजी-नातीचा धम्माल डान्स; अभिनेत्री अदिती द्रविडचा हा VIDEO एकदा पाहाचं

‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Maza Navryachi Bayako) मध्ये अदिती द्रविड ईशा(Isha) या नावाने लोकप्रिय झाली होती.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 27 मे-  ‘माझ्या नवऱ्याची बायको’ (Maza Navryachi Bayako)  फेम ईशा (Isha)  म्हणजेच अभिनेत्री अदिती द्रविड (Aaditi Dravid) सध्या चांगलीच चर्चेत आहे. अदितीचा एक क्युट व्हिडीओ व्हायरल (Viral Video)  होतं आहे. त्यामध्ये ती आपल्या आजीला(Grand mother)  डान्स शिकवताना दिसत आहे. हा व्हिडीओ चाहत्यांना खुपचं पसंत पडत आहे. अदिती उत्मम डान्सर आहेच. पण तिची आज्जी देखील इतकं उत्तम डान्स करते हे पाहून चाहतेसुद्धा अवाक् झाले आहेत.

जाहिरात

अदिती द्रविड ही एक उत्तम अभिनेत्री, गायिका आणि डान्सर म्हणून ओळखली जाते. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेत तिने शनायाच्या मैत्रिणीची म्हणजेच ‘ईशा’ ची व्यक्तिरेखा साकारली होती. त्यामुळे तिला चांगली लोकप्रियता मिळाली होती. अदिती सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रीय असते. ती सतत आपले वेगवेगळे व्हिडीओ आणि फोटो चाहत्यांसाठी शेयर करत असते. (हे वाचा: मनू-अनिकेतला वेगळं करण्याचं समरने दिलं चॅलेंज, ‘पाहिले नं मी तुला’मध्ये नवं वळण   ) नुकताच अदितीने आपल्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेयर केला आहे. यामध्ये ती आपल्या आज्जीला डान्सच्या काही स्टेप्स शिकवताना दिसत आहे. आणि आज्जी देखील त्या स्टेप्स अगदी उत्तम प्रकारे करत आहे. आज्जी आणि नातीचा हा क्युट व्हिडीओ पाहून चाहते जाम खुश झाले आहेत. आणि या व्हिडीओवर मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि कमेंट्स सुद्धा करत आहेत. (हे वाचा: मराठमोळ्या सई लोकूरचा साउथ इंडियन तडका, डान्सचा धम्माल VIDEO VIRAL ) अनेक युजर्सनी कमेंट करत आज्जी खूप गोड असून, डान्सही उत्मम करते असं म्हटलं आहे. तर कित्येकांनी आज्जीला ‘कूल’ असं म्हटलं आहे.  या दोघींच्या या धम्माल डान्सची चांगलीच चर्चा रंगलीय. अदिती अभिनेत्री आणि डान्सर सोबतचं एक उत्तम सिंगरसुद्धा आहे. तिचे काही अल्बमसुद्धा रिलीज झाले आहेत. आदितीने शनाया म्हणजेच रसिका सुनीलसोबत ‘You And Me’ हा अल्बम केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात