श्रेयस तळपदेसह छोट्या परीलाही लागले 'पुष्पा'चे वेड, मायराचा हा देखील VIDEO VIRAL
श्रेयस तळपदेसह छोट्या परीलाही लागले 'पुष्पा'चे वेड, मायराचा हा देखील VIDEO VIRAL
Shreyas Talpade
मराठी मालिका माझी तुझी रेशीम गाठ फेम छोटी परी म्हणजेच मायरा (Myra Vaikul)आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) यांनादेखील साउथ सुपरस्टार अभिनेता अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा द राइज' या चित्रपटाचा फिव्हर चढला आहे.
मुंबई, 13 जानेवारी: पुष्पा सिनेमात (Pushpa The Rise in Hindi) अल्लू अर्जुनची (Allu arjun) ऍक्शन पाहून चाहते घायाळ झाले. सिनेमा रिलीज होऊन आता जवळपास महिना व्हायला आला आहे. पण अजूनही बॉक्सऑफिसवर सिनेमाची कमाल कमाई सुरु आहे.
मुळात तेलुगुमध्ये तयार करण्यात आलेल्या पुष्पाच्या हिंदी वर्जनलाही तुफान प्रतिसाद मिळतोय. पुष्पा या चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या अनेक डायलॉगवर सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रेटी रील्स बनवताना दिसता आहे. या यादीमध्ये आता माझी तुझी रेशीम गाठ फेम छोटी परी म्हणजेच मायरा (Myra Vaikul)आणि मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade)यांचादेखील सहभाग आहे. विशेष म्हणजे, हिंदी भाषेत हा सिनेमा हिट होण्यात अभिनेता श्रेयस तळपदेचाही मोठा वाटा आहे.
'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी परी म्हणजे मायरा वायकुळ नेहमीच या ना त्या कारणाने सध्या चर्चेत असते. अनेक गाण्यावर रील्स तयार करत सध्या ती चाहत्यांच्या मनावा अधिराज्य गाजवताना दिसत आहे. दरम्यान, तिने नुकतंच पुष्पा या सिनेमातील अल्लू अर्जुनच्या डायलॉगवर रील्स बनवली आहे. या रील्समध्ये ती एकटी नसून अभिनेता श्रेयस तळपदेही दिसत आहे.
या दोघांनी मिळून, 'पुष्पा नाम सुनके फ्लॉवर समजे क्या? फायर हूं मै झुकूंगा नही' अल्लूचा हा प्रसिद्ध डॉयलॉग मारताना दिसत आहेत. त्यांचा हा रील सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे.
विशेष म्हणजे हिंदी भाषेत हा सिनेमा हिट होण्यात अभिनेता श्रेयस तळपदेचाही मोठा वाटा आहे. फार कमी लोकांना माहीत आहे की पुष्पा द राइज सिनेमाच्या हिंदी व्हर्जनला अर्जुनला आवाज श्रेयस तळपदे ने दिला आहे. याबाबतची माहिती स्वतः श्रेयसने सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना दिली होती.
'पुष्पा द राइज' सिनेमाच्या निमित्ताने भारतातील सर्वात सामर्थ्यवान आणि स्टायलिश अभिनेत्याचा हिंदीमधील आवाज झाल्याबद्दल अभिमान वाटत असल्याचं श्रेयसने पोस्टमध्ये म्हटले होते.
Published by:Dhanshri Otari
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.