मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /'हा' स्पर्धक बनला MasterChef India 7 चा विजेता; बक्षीसात मिळालं काय-काय? रकमेचा करणार असा वापर

'हा' स्पर्धक बनला MasterChef India 7 चा विजेता; बक्षीसात मिळालं काय-काय? रकमेचा करणार असा वापर

'मास्टरशेफ इंडिया 7'चा महाअंतिम सोहळा

'मास्टरशेफ इंडिया 7'चा महाअंतिम सोहळा

MasterChef India Season 7 Winner:छोट्या पडद्यावरील रियॅलिटी शोची सध्या जोरदार क्रेझ आहे. डान्स, सिंगिंगपासून ते कुकिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीतील टॅलेंट दाखवण्यासाठी विविध रिऍलिटी शो आयोजित करण्यात येत आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

मुंबई. 1 एप्रिल- छोट्या पडद्यावरील रियॅलिटी शोची सध्या जोरदार क्रेझ आहे. डान्स, सिंगिंगपासून ते कुकिंगपर्यंत प्रत्येक गोष्टीतील टॅलेंट दाखवण्यासाठी विविध रिऍलिटी शो आयोजित करण्यात येत आहेत. बिग बॉस, इंडियन आयडॉल, डान्स इंडिया डान्स, अशी अनेक रिऍलिटी शो प्रचंड चर्चेत असतात. या यादीतील आणखी एक नाव म्हणजे 'मास्टरशेफ इंडिया' होय. घरातील सर्वसामान्य स्त्रीपासून मोठमोठ्या रेस्टोरंटसमधील शेफ पर्यंत प्रत्येक व्यक्तीला आपलं कुकिंग टॅलेंट दाखवण्याची संधी याठिकाणी मिळते.

टीव्हीवर सध्या 'मास्टरशेफ इंडिया'चा सातवा सीजन सुरु होता. नुकतंच या सीजनचा महाअंतिम सोहळा पार पडला. स्पर्धक शेफ नयनज्योती सैकिया हा 'मास्टरशेफ इंडिया सीजन 7' चा विजेता ठरला आहे. हा शो 2 जानेवारीपासून सुरु झाला होता. या शोमध्ये शेफ विकास खन्ना, गरिमा अरोरा आणि रणवीर ब्रार परीक्षक म्हणून होते. हा शो सुरु झाल्यापासूनच सतत चर्चेत आहे. या शोला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम आणि प्रतिसाद मिळाला आहे. शोचा 7 वा सीजन तब्बल 2 वर्षाच्या गॅपनंतर भेटीला आला होता.शोच्या 7व्या सीजनमध्ये देशाच्या विविध भागांतील 16 स्पर्धकांनी आपलं पाककौशल्य दाखवलं.

(हे वाचा:Shahid Kapoor: शाहिद कपूरच्या आईने केलेत 3 लग्नं; अभिनेत्याबाबत सावत्र भाऊ ईशान खट्टर म्हणाला... )

यामध्ये नयनज्योती सैकिया, सांता सरमाह आणि सुवर्णा बागुल यांनी अनेक आव्हानं पेलत टॉप 3 मध्ये स्थान बनवलं होतं. अंतिम फेरीत सांता सरमाह आणि सुवर्णा बागुल यांचा पराभव करत नयनज्योती सैकियाने 'मास्टरशेफ इंडिया सीजन 7' चं विजेतेपद पटकावलं आहे. नयनज्योती हा मूळचा आसाचा रहिवासी आहे. आपल्या चविष्ट पदार्थांनी त्याने परीक्षक आणि प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. नयनज्योती या शोचा विजेता बनू शकतो असा अंदाज सोशल मीडियावर चाहते सतत व्यक्त करत होते.

नयनज्योती सैकियाने 'मास्टरशेफ इंडिया सीजन 7' चं विजेतेपद पटकावल्यानंतर, त्याला शोची ट्रॉफी तसेच 25 लाख रुपयांची मोठी रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली आहे. यासोबतच त्याने शेफच्या मास्टरशेफ जॅकेटही आपल्या नावावर केले आहेत. नयनज्योतीचा प्रवास खूप प्रेरणादायी आहे. त्याने शोमध्ये सांगितलं की, त्याच्या वडिलांची इच्छा नव्हती की त्याने स्वयंपाक करावा. त्याने स्वयंपाकाचं कोणतंही व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेलं नाहीय. तो स्वतः प्रयत्न करुन विविध पदार्थ बनवायला शिकला आहे.

नवज्योतीला स्वतःचं रेस्टॉरंट सुरु करायचं आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला,“बर्‍याच लोकांना ईशान्येकडील पदार्थांची माहिती नाही. सांताजी आणि मी मास्टरशेफ इंडियामध्ये ईशान्येकडील पाककृती बनवण्याचा प्रयत्न केला. पण ते 1% देखील नाही. तिथे अनेक प्रकारचे स्वादिष्ट पदार्थ बनवले जातात. त्यामुळे मला ते माझ्या रेस्टॉरंटमध्ये सर्व्ह करायचे आहेत आणि त्यासाठी मला खूप मोठी रक्कम हवी आहे. जिंकलेली रक्कम मला यामध्ये उपयोगी पडेल.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Tv shows