मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो का? दिग्दर्शकाने अखेर सोडलं मौन

Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो का? दिग्दर्शकाने अखेर सोडलं मौन

 नुकतंच 'मासूम सवाल' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरवर प्रचंड टीका केली जात आहे.

नुकतंच 'मासूम सवाल' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरवर प्रचंड टीका केली जात आहे.

नुकतंच 'मासूम सवाल' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरवर प्रचंड टीका केली जात आहे.

    मुंबई, 11 ऑगस्ट-   नुकतंच 'मासूम सवाल' या चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. त्यांनतर सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. सोशल मीडियावर या पोस्टरवर प्रचंड टीका केली जात आहे. तसेच या पोस्टरवर मोठा आक्षेप घेतला जात आहे. कारण या पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो दाखविण्यात आला आहे. त्यामुळे काही लोक याला विरोध करत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांच्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आला आहे. यासोबतच चित्रपटाचे निर्माते आणि प्रॉडक्शन टीमवरही एफआयआर दाखल करण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मौन सोडत दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संतोष उपाध्याय यांनी 'News18.com'शी संवाद साधत चित्रपटाची सत्य कथा आणि पोस्टरच्या वादावर भाष्य केलं आहे. चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅड दाखवणं का इतकं महत्वाचं आहे याबाबत त्यांनी सांगितलं आहे. दिग्दर्शक संतोष उपाध्याय यांनी या चित्रपटाबाबत बोलताना सांगितलं की, 'मासूम सवाल' हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटाची संपूर्ण कथा एका 12 वर्षांच्या मुलीपासून प्रेरित आहे. जिच्या पहिल्या मासिक पाळीनंतर तिची समस्या सुरु होते. या सर्व घटना या चित्रपटात दाखविण्यात आल्या आहेत. दिग्दर्शक संतोष उपाध्याय हे फक्त दिग्दर्शकच नव्हे तर ज्योतिषीही आहेत. अशा वेळी विविध लोक आपल्या समस्या घेऊन त्यांच्याकडे येतात. 'मासिक पाळी' सारख्या धाडसी विषयावर चित्रपट बनवल्याबद्दल संतोष उपाध्याय यांनी म्हटलं की, 'मासिक पाळी आणि श्रद्धेशी संबंधित काही गैरसमज' यातून लोकांना जागृत करण्यासाठी हा चित्रपट बनवला आहे. एका 12 वर्षांच्या मुलीच्या एका प्रश्नावरुन त्यांना या कथेची कल्पना सुचल्याचं संतोष यांनी सांगितलंय'. याबाबत सविस्तर बोलताना त्यांनी म्हटलं, “2014 मध्ये, रक्षाबंधन सणाच्या वेळी, एक 12 वर्षाची मुलगी माझ्याकडे आली, जी भगवान श्रीकृष्णाला आपला भाऊ मानते आणि तिला तिच्या भावाला राखी बांधायची होती. पण मासिक पाळीमुळे ती कान्हाच्या मूर्तीला स्पर्श करू शकत नव्हती आणि राखीही बांधू शकत नव्हती. ती मुलगी तिची समस्या घेऊन माझ्याकडे आली आणि मला प्रश्न विचारला की मासिक पाळी अशुद्ध असते का? या कालावधीत मूर्तीला स्पर्श करणं पाप आहे का? मुलीच्या या प्रश्नाने मी खूप भावुक झालो. त्यानंतर 2014 पासून मी त्या विषयावर चित्रपट बनवण्याचा विचार करत होतो." दिग्दर्शकाच्या मते, 'मासूम सवाल' ही त्याच मुलीची कथा आहे जी पूर्णपणे सत्य घटनेवर आधारित आहे. हा चित्रपट असला तरी तो सत्य घटनेवर आधारित आहे. (हे वाचा:Masoom Sawaal: सॅनिटरी पॅडवर श्रीकृष्णाचा फोटो; 'मासूम सवाल' च्या पोस्टरवर होतेय टीका ) 'पोस्टर कॉन्ट्रोव्हर्सी'वर संतोष उपाध्याय म्हणतात की, त्यांच्यावर जे काही आरोप करण्यात आले आहेत. ते निराधार आहेत. त्याचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. त्यांच्याशी माझा काहीही संबंध नाही. पोस्टरमध्ये सॅनिटरी पॅड दाखवणं आवश्यक आहे कारण हा चित्रपटाचा मुद्दा आहे. आम्ही त्यापलीकडे जाऊ शकत नाही कारण जर आम्ही असं केलं तर चित्रपटाचा मुख्य मुद्दा मागे पडेल. त्यांनी असंही म्हटलं, “पोस्टर एक मूक टीजर आहे. ही गोष्ट प्रत्येकाने समजून घेतली पाहिजे. पोस्टरवरून पॅड काढून टाकलं तर लोकांना कसं समजेल हा चित्रपट कोणत्या विषयावर बनवला आहे. ज्यांनी ट्रेलर पाहिला नाही, ते पोस्टर पाहून काय अंदाज लावतील. पोस्टरमध्ये पॅड दाखवण्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांना समजेल की हा चित्रपट कोणत्या मुद्द्यावर बनला आहे.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Bollywood News, Entertainment

    पुढील बातम्या