मुंबई, 29मार्च - आपला इतिहास हा आपला अभिमान असतो. आणि हा इतिहास प्रत्येक व्यक्ती सांभाळत असतो. आपल्याला इतिहासातील फक्त थोड्याफार गोष्टी माहित असतात. मात्र अशा बऱ्याचं गोष्टी असतात. ज्या आपल्या कधीही ऐकण्यात आलेल्या नसतात. अशावेळी विविध मालिका आणि चित्रपटांमुळे आपल्या इतिहासातील बऱ्याच गोष्टींची माहिती होते. मराठी चित्रपटसृष्टीत इतिहासावर आधारित अनेक चित्रपट (New Marathi movie) आले आहेत. आणि आगामी काळात येणार सुद्धा आहेत. त्यातीलचं एक चित्रपट म्हणजे ‘रावरंभा’ (Ravrambha marathi cinema) हा होय.
View this post on Instagram
मराठी इतिहासाची अस्मिता जपणारा हा चित्रपट असेल. नुकताच सोशल मीडियावर या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. त्यामध्ये ‘shoot begins’ असं सांगण्यात आलं आहे. म्हणजे या चित्रपटाचं चित्रिकरण नुकताच सुरु झालं आहे. अनुप अशोक जगदाळे यांच्या दिग्दर्शनाखाली हा चित्रपट तयार केला जाणार आहे. तसेच कथा,पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांची आहे.फारच कमी लोकांना ‘रावरंभा’ यांच्याबद्दल माहिती आहे. त्यामुळेच या पोस्टरच्या खाली ‘इतिहासात गडप झालेलं एक मोरपंखी पान’ असं कॅप्शन देण्यात आलं आहे.
(हे वाचा:पाहा देवमाणूसमधील मायराचं बॉलिवूड कनेक्शन; सलमान-वरुणसोबत केलंय काम)
रावरंभा हे फलटणचे बजाजी निंबाळकर यांचे पुत्र महादजी यांचे ते पुत्र होते. आपल्याला जरी फारसं माहिती नसलं तरी त्यांचा कार्यकाल खूप मोठा आहे. इतिहासाच्या अनेक महत्वाच्या घटनांमध्ये त्यांचा महत्वाचा उल्लेख आढळतो. 18व्या शतकात मराठ्यांच्या इतिहासात निंबाळकर हे घराणं खूपचं प्रसिद्ध होतं. त्यांनी मराठ्यांच्या शिरात मानाचा तुरा रोवणाऱ्या अनेक कामिगिरी केल्या आहेत.
1707 मध्ये रावरंभा निंबाळकर यांनी धनाजी यांचं मार्गदर्शन घेतं, औरंगजेब याच्या छावणीवर हल्ला केला होता.
रावरंभा यांना निजामाने ‘रावरंभा’ ही पदवी दिल्याचं आढळतं. रावरंभा म्हणजे सतत जिंकणारा असं त्याचा अर्थ होतो. त्यांचं मूळ नाव ‘रंभाची बाजी’ असं होतं. रावरंभा हे देवीचे मोठे भक्त असल्याचं सुद्धा आढळतं. त्यांनी आपल्या कारकिर्दीत तुळजापूरमध्ये मंदिराजवळ तटबंदी आणि दरवाजेसुद्धा बांधले आहेत. चित्रिकरणाला सुरुवात झालेलं पोस्टर पाहून चाहत्यांना या ऐतिहासिक चित्रपटाची उत्कंठा लागून राहिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.