मुंबई, 21 नोव्हेंबर: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकांपैकी एक मालिका म्हणजे ‘देवमाणूस’(Devmanus). या मालिकेने 15 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता मालिकेचा दुसरा सिझन (Devmanus season 2) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर दुसऱ्या सिझनचा प्रोमो शेअर करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी, सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती. त्यामध्ये एका फॅन पेजने देवमाणूस मालिकेचे पोस्टर शेअर करत ‘डिसेंबर महिन्यात देवमाणूस २ येणार? सध्या मालिकेच्या प्री-प्रोडक्शनचे काम सुरु आहे’ असे लिहिले होते. तेव्हा अधिकृत माहिती नव्हती. पण आता यासंदर्भात अधिकृत माहीती समोर आली आहे. नुकतंच झी मराठी वाहिनीच्या अधिकृत इंस्टाग्रामवर ‘देवमाणूस 2’ ही मालिका लवकरच येणार असल्याची माहिती प्रेक्षकांना दिली आहे. प्रोमोमध्ये रात्रीची वेळ दाखवली. संपूर्ण वाडा दाखवण्यात आला असून दवाखाना लिहले पाटी खाली पाडण्यात आली आहे.’ असे प्रोमोमध्ये दाखवण्यात आले आहे. हा प्रोमो पाहता चाहत्यांची उत्सुकत्ता शिगेला पोहचली आहे.
काय होता मालिकेचा शेवट?
15 ऑगस्टला मालिकेचा शेवटचा भाग प्रदर्शित झाला. त्यामुळे चाहते फारच उत्सुक होते. पण शेवटी प्रेक्षकांची निराशाच झालेली पाहायला मिळाली. आता तरी देवी सिंग पोलिसांच्या ताब्यात जाईल असं प्रेक्षकांना वाटत होतं पण तसं झालं नाही. दरम्यान शेवटी चंदाचा आणि विजयचा मृत्यू दाखवला आहे. याशिवाय नव्यानेच मालिकेत एन्ट्री दाखवलेल्या स्त्रीचा देखील डॉक्टर ने खून केलेला दाखवला आहे. वाड्यातील लोकांना देवमाणसाचा खरा चेहरा मात्र समजला नाही. चंदा आणि डॉक्टरचा मृत्यू झाल्याचं लोकांना समजत. तर डॉक्टरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. एकूणच संपूर्णपणे अनपेक्षित शेवट पाहायला मिळाला आहे. दरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला नसून तो जिवंत आहे. डिम्पलने चंदाचा खून केला. तर तिची बॉडी देखील जाळून टाकली. याशिवाय आणखी एक बॉडी तिथे जळत असते. तिच्या आजूबाजूला डॉक्टर च साहित्य पसरवलेल असतं. त्यामुळे डॉक्टरचाच मृत्यू झाल्याचं डिम्पलने भासावल होतं. तर आता ती देखील घरातून पळून गेली आहे.डॉक्टर एका दवाखान्यात अॅडमिट आहे. व तो अजून ही जिवंत आहे. त्यामुळे आता प्रेक्षकांमध्ये ‘देवमाणूस 2’ची (Devmanus season 2) उत्सुकता वाढली आहे. तर मालिकेचा अद्याप शेवट झाला नसल्याने आणखी एक भाग येणार अशी चर्चा रंगताना दिसत आहे. अनेकांनी शेवट योग्य केला नाही यामुळे नाराजी व्यक्त केली होती.