जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : आदर्श-उत्कर्ष नंतर आता शिंदेंच्या लेकीची संगीत क्षेत्रात धमाकेदार एंट्री

VIDEO : आदर्श-उत्कर्ष नंतर आता शिंदेंच्या लेकीची संगीत क्षेत्रात धमाकेदार एंट्री

VIDEO : आदर्श-उत्कर्ष नंतर आता शिंदेंच्या लेकीची संगीत क्षेत्रात धमाकेदार एंट्री

आतापर्यंत सर्वांनी शिंदे बॉयजच्या आवाजाची जादू अनुभवली आता या घरण्यातील पहिल्या गायिकेने संगीत क्षेत्रात धमाकेदार एंट्री केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 मार्च-  शिंदे घराण्यातील आदर्श शिंदे असेल किंवा उत्कर्ष शिंदे यांनी आजपर्यंत अनेक हिट गाणी दिली आहेत. आतापर्यंत सर्वांनी शिंदे बॉयजच्या आवाजाची जादू अनुभवली आता या घरण्यातील पहिल्या गायिकेने संगीत क्षेत्रात धमाकेदार एंट्री केली आहे. स्वरांजली शिंदे**(Swaranjali Shinde)** असं तिचं नाव आहे.सुप्रसिद्ध गायक मिलिंद शिंदे (Milind Shinde) यांची ती कन्या आहे. स्वरांजली शिंदेचा**(Swaranjali Shinde)** ‘ना सांगता ना बोलता छंद लागला तुझा, समजना उमजना सावरू कसा मना’ अशी मनोवस्था व्यक्त करणारा “सांग रे मना….” हा नवाकोरा म्युझिक व्हिडिओ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या म्युझिक व्हिडिओतून स्वरांजली संगीत क्षेत्रात पदार्पण करत आहे.

सप्तसूर म्युझिकच्या साईनाथ राजाध्यक्ष यांची प्रस्तुती असलेल्या “सांग रे मना” या म्युझिक व्हिडिओची निर्मिती एसआरवाय प्रॉडक्शनने केली आहे. रुपेश खांदर या नव्या दमाच्या संगीतकारानं या गाण्याला संगीत दिलं आहे. तसंच स्वरांजलीसह त्यांनी गाणं गायलही आहे. तर सुहास रुके आणि माऊली कोळी या म्युझिक व्हिडिओमध्ये दिसणार आहेत. सप्तसूर म्युझिकने आतापर्यंत अनेक नव्या दमाच्या कलाकारांना प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे. त्यात आता सांग वे मना या म्युझिक व्हिडिओचीही भर पडली आहे. वाचा- फुलाला सुंगध.. मालिकेत दोन अभिनेत्रींची एंट्री, दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत प्रेमामध्ये आकंठ बुडालेल्या प्रेमिकांच्या भावना ‘सांग रे मना’ या गाण्यात मांडण्यात आल्या आहेत. तसंच, उत्तम चित्रीकरण, उत्तम कलाकारही यात असल्यानं म्युझिक व्हिडीओही जमून आला आहे. त्यामुळे प्रत्येक प्रेमिकाची ‘सांग रे मना’ ही भावना आता सुरेल आणि देखण्या पद्धतीनं चित्रीत झाली आहे.  आता या गाण्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार हे पाहणं उत्सुकतेचे ठरणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात