मुंबई, 4 ऑगस्ट- ‘फुलपाखरू’ (Phulpakharu) फेम अभिनेत्री हृता दुर्गुळे(Hruta Durgule) चाहत्यांमध्ये खुपचं लोकप्रिय आहे. तिच्या क्युटनेसने सर्वांचं वेड लावलं होतं. या मालिकेमुळे ती तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी ही मालिका बंद झाली होती. आणि म्हणूनचं तिचे चाहते खुपचं दुखी झाले होते. मात्र हृताच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ती म्हणजे काही महिन्यांच्या विश्रांतीनंतर हृता पुन्हा एकदा टीव्हीवर परतली आहे. ती लवकरच ‘मन उडु उडु झालं’ (Man Udu Udu Jhal)या मालिकेत झळकणार आहे.
नुकताच झी मराठीवर एका नव्या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला आहे. या मालिकेचं नाव आहे, ‘मन उडु उडु झालं’. ही मालिका एक रोमँटिक स्टोरी असणार आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणून तरुणाईच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री हृता दुर्गुळे झळकणार आहे. तर तिच्यासोबत अभिनेता म्हणून ‘विठूमाऊली’ फेम अभिनेता अथर्व राऊत असणार आहे. अथर्वने या मालिकेत विठ्ठल देवाची भूमिका साकारली होती. या दोघांची जोडी पहिल्यांदाचं पडद्यावर झळकणार आहे. त्यामुळे या फ्रेश जोडीसाठी चाहते खुपचं उत्सुक आहेत. (हे वाचा: गुलाबी रंगाच्या साडीत तेजस्विनीचा जलवा; सिद्धार्थ जाधवच्या कमेंटने वेधलं लक्ष ) या मालिकेचा प्रोमो खुपचं इंटरेस्टिंग दिसत आहे. प्रोमोमध्ये हृता अगदी सिंपल लुकमध्ये दिसून येतं आहे. प्रोमोमध्ये अथर्व आणि हृता रेल्वे स्टेशनवर एकमेकांसमोर येतात. हिरो म्हणजेच तेथे एकाला मारपीट करत असतो. मात्र हृताला पाहताच तो त्या व्यक्तीला चक्क सोडून देतो. आणि हिरोईनला पाहताक्षणीचं तिच्या प्रेमात पडतो, असा हा प्रोमो आहे. आत्ता मालिकेची नेमकी कथा काय असणार याबद्दल चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. सध्या झी मराठीवर नव्या मालिकांचं जणू पेवचं फुटलं आहे. अनेक नव्या मालिका आपल्या भेटीला येत आहेत.