VIDEO: समरचा डाव यशस्वी; 'पाहिले नं मी तुला' मालिकेत नवा ट्विस्ट

VIDEO: समरचा डाव यशस्वी; 'पाहिले नं मी तुला' मालिकेत नवा ट्विस्ट

‘पाहिले न मी तुला’ (pahile Na Mi Tula) या मालिकेमध्ये दररोज नवनवीन ट्वीस्ट येत आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जून- ‘पाहिले न मी तुला’ (pahile Na Mi Tula) या मालिकेमध्ये दररोज नवनवीन ट्वीस्ट येत आहेत. मनू (Manu)  आणि अनिकेतला(Aniket)  वेगळ करण्यासाठी समर वाटेल ते करायला तयार आहे. समर दररोज एक नवं संकट मनू आणि अनिकेतसमोर आणून ठेवतो. नुकताच समोर आलेल्या नव्या प्रोमोमध्ये समरने अनिकेत आणि त्याच्या आईमध्ये ताटातुट करण्याचा घाट घातला आहे.

View this post on Instagram

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी टीव्हीवरील ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका खूपच पसंत केली जाते. मनू आणि अनिकेतची लव्हस्टोरी आणि त्यात समरची ढवळाढवळ चाहत्यांना खूपच पसंत पडते. नुकताच रिलीज झालेल्या नव्या प्रोमोमध्ये समरने मनू आणि अनिकेतच्याविरुद्ध पुन्हा एक नवा डाव रचला आहे. समर मदत करणायाच्या हेतूने एका इन्वेस्टरला अनिकेतच्या घरी घेऊन येतो. आणि मुद्दामहून अनिकेत कोणताही अधिकारी नसून एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. हे सत्य त्याच्या आईसमोर उघड करतो. त्यामुळे अनिकेतची आई अनिकेतवर भडकते आणि आजपासून आपला काहीही संबंध नसल्याचं सांगते. मनू आणि अनिकेत आईला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. असा हा नवा प्रोमो सध्या व्हायरल होत आहे.

(हे वाचा:सोनू सूद झाला हतबल; प्रयत्न करूनही नाही वाचवू शकला अभिनेत्रीच्या भावाचे प्राण   )

अनिकेत आणि मनूने गुपचूप लग्न केल होतं. मात्र मनूच्या घरी ही गोष्ट समजल्यानंतर तिचे बाबा रागाच्या भरात तिला घराबाहेर काढतात. त्यामुळे मनू अनिकेतच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहू लागते. यासर्वांच्या मध्ये मनूचा बॉस म्हणजेच समर त्यांना वेगळं करण्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. म्हणूनच समर दररोज नवी संकटे या जोडीसमोर आणून ठेवत असतो. या सर्व संकटांवर मात करून मनू आणि अनिकेत सोबत राहणार की समरचा डाव यशस्वी होणार याकडे दर्शकांचं लक्ष लागलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: June 8, 2021, 5:51 PM IST

ताज्या बातम्या