जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Devmanus 2: काय ती रस्सी, काय तो फास, काय तो खटका, एकदम ओक्के!... देवमाणसाचा खेळ खल्लास अखेर अजितला मिळणार त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा

Devmanus 2: काय ती रस्सी, काय तो फास, काय तो खटका, एकदम ओक्के!... देवमाणसाचा खेळ खल्लास अखेर अजितला मिळणार त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा

Devmanus 2

Devmanus 2

इन्स्पेकटर जामकर सध्या अजितकुमारविरोधातील पुरावे गोळा करत आहे. लवकरच जमकरला त्याच्या प्रयत्नात यश येणार असल्याचं दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये डॉक्टर अजितकुमारला फाशी होण्याचे संकेत दिले आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 14 जुलै : झी मराठीवरील (Zee Marathi) ‘देवमाणूस 2’ (Devmanus 2) मधील ट्विस्टची मालिका काही थांबायला तयार नाही. या मालिकेत सारखे ट्विस्ट आणून मालिका आणखी रंजक बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे. देवमाणूस २ आता अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोचली आहे. इन्स्पेकट मार्तंड जामकर आणि डॉक्टर अजितकुमार यांच्यातील सामना चांगलाच रंगला आहे. इन्स्पेकटर जामकर सध्या अजितकुमारविरोधातील पुरावे  गोळा करत आहे.लवकरच जमकरला त्याच्या प्रयत्नात यश येणार असल्याचं दिसत आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये डॉक्टर अजितकुमारला फाशी होण्याचे संकेत दिले आहेत. एकीकडे अजितकुमारने आपल्या सर्व गुन्ह्यांची कबुली जमकरला दिली आहे. पण पुराव्यांअभावी तो डॉक्टरला अटक करू शकत नाही. पण डॉक्टरला त्याच्या गुन्ह्यांची शिक्षा देण्यासाठी जामकर प्रयत्न करत आहे. येत्या रविवारी या मालिकेचा दोन तसंच विशेष भाग प्रदर्शित होणार आहे. झी मराठीने नुकतंच त्याचा प्रोमो रिलीज केला आहे. या नव्या प्रोमोमध्ये अजितकुमार त्याने आतापर्यन्त केलेल्या खुनांची उजळणी करतोय आणि शेवटी ‘आता जामकर तुझा नंबर’ असं म्हणतोय. पण तेवढ्यात ‘काय ती रस्सी, काय तो फास, काय तो खटका, एकदम ओक्के! असा जामकरचा आवाज ऐकायला येतो आणि अजितकुमारच्या गळ्यासमोर फास येतो. त्यामुळे देवमाणूस २ मध्ये येणारा हा नवा ट्विस्ट प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे.

जाहिरात

देवमाणूस २ मालिकेचा पहिला सिझन प्रचंड गाजला होता. पण दुसऱ्या सीझनने प्रेक्षकांची निराशा केल्याचं पाहायला मिळालं होत. पण मालिकेमध्ये इन्स्पेक्टर जामकरची एंट्री झाल्यापासून मालिका पुन्हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे असं दिसतंय. हेही वाचा -  Shreyas Talpade : कंगनाच्या इंदिरा गांधींबरोबर झळकणार मराठमोळा अभिनेता; Emergency मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका दरम्यान नुकतीच मालिकेमध्ये जामकरची बायको म्हणून स्नेहल शिदमने  एंट्री  केली आहे. अजितकुमार आता तिला जामकर विरोधात भडकवून स्वतःच्या जाळ्यात ओढणार आहे. या सगळ्यात डिंपलसुद्धा त्याला साथ देत आहे. त्यामुळे मालिकेत आता पुढे नेमकं काय घडणार आहे ते बघणं महत्वाचं ठरेल. इन्स्पेक्टर जामकरने गुवाहाटी स्टाईलमध्ये दिलेल्या या धमकीला अजितकुमार कसे प्रत्युत्तर देतो ते बघणं महत्वाचं ठरणार आहे. आता जामकर आणि अजितकुमार यांच्यातील लढाई नक्की कोण जिंकणार, अजितकुमारला खरंच फाशी होणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात