मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Shreyas Talpade : कंगनाच्या इंदिरा गांधींबरोबर झळकणार मराठमोळा अभिनेता; Emergency मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका

Shreyas Talpade : कंगनाच्या इंदिरा गांधींबरोबर झळकणार मराठमोळा अभिनेता; Emergency मध्ये महत्त्वपूर्ण भूमिका

Actor Shreyas Talpade

Actor Shreyas Talpade

मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) एकाच वेळी 'माझी तुझी रेशीमगाठ'सारखा डेली सोप आणि शिवाय हिंदी सिनेमांमध्येही महत्त्वाच्या भूमिका करताना दिसतोय. 'इमर्जन्सी' या आगामी सिनेमाचा first look कंगनाच्या इंदिरा गांधींच्या भूमिकेने चर्चेत असला तरी यात श्रेयसची भूमिकाही महत्त्वाची ठरणारी आहे.

पुढे वाचा ...
  मुंबई, 14 जुलै- मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे (Shreyas Talpade) हा सतत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारत असतो. तो यशवर्धन चौधरी म्हणून टेलिव्हिजन तर गाजवत आहेच. पण येणाऱ्या काळात मोठा पडदा गाजवायला देखील श्रेयस सज्ज झाला आहे. आता तो पुन्हा एकदा  बॉलिवूडच्या नव्या कोऱ्या चित्रपटातून वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' (Emergency)) चित्रपटात श्रेयस तळपदे महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच कंगनाने तिच्या सोशल मीडियावरून प्रेक्षकांना हि बातमी दिली आहे. कंगना या चित्रपटामध्ये भारताच्या दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारणार आहे. हा इंदिरा गांधीजीवरील बायोपिक नसून इतिहासातील एका महत्वपूर्ण घटनेवर आधारित चित्रपट आहे. अभिनेत्री कंगना रानौत दिग्दर्शित करत असलेल्या या चित्रपटामध्ये श्रेयसची भूमिका नेमकी काय असेल याबद्दल अजून स्पष्टता आलेली नाही. पण तो एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे हे नक्की.
  View this post on Instagram

  A post shared by Marathi TRP (@trpmarathi)

  अभिनेता श्रेयस तळपदेचा नावीन्यपूर्ण भूमिका करण्याकडे कल असतो. सध्या तो चित्रपट, टेलिव्हिजन सगळी माध्यमे गाजवत आहे. नुकतीच त्याची 'कौन प्रवीण तांबे' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.. त्याला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. तर झी मराठीवरील (Zee Marathi)  'माझी तुझी रेशीमगाठ' मधील यशसुद्धा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. तर त्याच्या 'पुष्पा' चित्रपटाच्या हिंदी डायलॉगने तर सगळीकडे धुमाकूळ घातला होता. हेही वाचा - Emergency First look - Kangana Ranaut इंदिरा गांधी शोभतेय का पाहा, आणीबाणीविषयीच्या सिनेमाचा फर्स्ट लुक आला समोर श्रेयस सध्या 'आपडी-थापडी' या मराठी चित्रपटात काम करत असून येत्या ७ ऑकटोबर रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात श्रेयस तळपदेसह मुक्त बर्वे, नंदू माधव, संदीप पाठक आणि नवीन प्रभाकर अशी तगडी स्टारकास्ट आहे. श्रेयस फक्त अभिनेताच नाही तर उत्तम दिग्दर्शक देखील आहे. पोस्टर बॉईज हा गाजलेला चित्रपट श्रेयसने दिग्दर्शित केला होता. तसेच येणाऱ्या काळात श्रेयसने दिगदर्शित केलेला 'सर कार कि सेवा मे' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. श्रेयसने त्याच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाबद्दल अजून कोणतीही घोषणा केली नाही. इमर्जन्सी या चित्रपटाची श्रेयसची भूमिका अजून गुलदस्त्यात आहे. पण त्याच्या चाहत्यांना आता या भूमिकेविषयी प्रचंड उत्सुकता आहे.
  Published by:News18 Intern
  First published:

  Tags: Kangana ranaut, Marathi entertainment

  पुढील बातम्या