मुंबई, 27 फेब्रुवारी- ज्येष्ठ कवी वि.वा.शिरवाडकर अर्थात कुसुमाग्रज यांचा 27 फेब्रुवारी हा ’ **(Kusumagraj Birth Anniversary )**जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन ( Marathi Language Day)म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त मराठी मनोरंजन विश्वातील कलाकरांनी सोशल मीडियावरून शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेते भरत जाधव यांनी यानिमित्त सोशल मीडिया पोस्ट केली आहे. भरत जाधव यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे की, आपलं मराठीपणं, त्यातला गोडवा आणि कडवटपणा आपल्या रोजच्या जगण्यात दिसायला हवा तरच चार अमराठी लोकांमध्ये अगदी मनापासून मराठी भाषा शिकायची, बोलायची अन वाचायची जिज्ञासा निर्माण होईल..!#मराठीभाषागौरवदिन #भरतजाधव..
भरत जाधव यांनी आजवर अनेक मराठी नाटक, मालिका, चित्रपटांमध्ये काम केले असून आज मराठीतील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्यांनी अनेक हिंदी चित्रपटात देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. शाहीर साबळे यांच्या महाराष्ट्राची लोकधारापासून त्यांच्या करिअरला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांची ऑल द बेस्ट ही एकांकिका प्रचंड गाजली. यावर आधारित असलेल्या ऑल द बेस्ट या नाटकाला तर लोकांनी डोक्यावर घेतले. त्यानंतर श्रीमंत दामोदर पंत, अधांतर, सही रे सही यांसारखी अनेक हिट नाटकं त्याने रंगभूमीला दिली. अलीकडे भरत जाधव सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय दिसतात. वाचा- ‘ठिपक्यांची रांगोळी’ फेम बाबी आत्याचे पती आहेत KBC चे पहिले करोडपती! अभिनेत्री प्राजक्ता माळी तसेत धनश्री काडगावकर, स्पृहा जोशी यांच्यासह अनेक मराठी कलाकारंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.