जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अंकुश महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य?' असा सवाल करणाऱ्यांना केदार शिंदेचं सडेतोड उत्तर

'अंकुश महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य?' असा सवाल करणाऱ्यांना केदार शिंदेचं सडेतोड उत्तर

फोटो सौजन्य- केदार शिंदे/इन्स्टाग्राम

फोटो सौजन्य- केदार शिंदे/इन्स्टाग्राम

शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (maharashtra shahir teaser release) या सिनेमा केदार-अकुंश या जोडीचं काम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. दरम्यान दिग्दर्शक केदार शिंदे याने अभिनेता अंकुश चौधरीसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 12 मे: अभिनेता अंकुश चौधरी (Ankush Chaudhari Marathi Movie) लवकरच एका नव्या भूमिकेत दिसणार आहे. शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता दिसणार असून या सिनेमाचे दिग्दर्शन अंकुशाच जवळचा मित्र केदार शिंदे (Kedar Shinde Movie) करणार आहे. शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारित ‘महाराष्ट्र शाहीर’ (maharashtra shahir teaser release) या सिनेमा केदार-अकुंश या जोडीचं काम पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने औरंगाबादमध्ये राज ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता. शाहीर साबळे हे केदार यांचे आजोबा आहेत. दरम्यान या सिनेमाविषयी केदार शिंदे नेहमीच वेगवेगळे अपडेट शेअर करत आला आहे. त्याने अलीकडेच अभिनेता अंकुश चौधरीचा शाहीर साबळेंच्या भूमिकेतील फोटो आणि शाहीर साबळेंचा फोटो यांचे कोलाज शेअर केले आहे. अशी पोस्ट करण्यामागचं कारणंही त्याने कॅप्शनमध्ये नमुद केलं आहे. हे वाचा- ‘एक अव्वल कलाकार..’ दिग्दर्शक केदार शिंदेंची राज ठाकरेंसाठीची पोस्ट चर्चेत दिग्दर्शक केदार शिंदे याने केलेल्या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘प्रत्येक जण मला विचारतोय की,  अंकुश चौधरी महाराष्ट्र शाहीर या भूमिकेसाठी कसा योग्य आहे? तो खुप वेगळा दिसतो. काहींनी हे पोस्टर पाहून अंकुशला ओळखलं सुध्दा नाही. नीट पाहा. एक फोटो अंकुश चा आहे आणि दुसरा शाहीर साबळे यांचा!! ही कमाल The Vikram Gaikwad team यांची… जगदीश येरे यांच्याकडून हा लूक निर्माण झाला आहे. लोकीज स्टुडिओ यांनी या सिनेमाचं पोस्टर डिझाईन केलं आहे. ही सुरूवात आहे. अजून बराच पल्ला आम्हाला गाठायचा आहे. पण प्रत्येक गोष्ट याच passionने करून हे शिवधनुष्य आम्ही नक्कीच पेलू. आपले आशीर्वाद असू द्यात. श्री स्वामी समर्थ.’ अशाप्रकारे अंकुश भूमिकेसाठी योग्य असा सवाल करणाऱ्यांना दिग्दर्शकाने थेट उत्तर दिलं आहे.

जाहिरात

याआधी देखील या सिनेमासंदर्भातील पोस्ट केदार शिंदेने शेअर केल्या आहेत. सिनेमाच्या पहिल्या पोस्टरपासून शाहीर साबळेंच्या जुन्या आठवणींपर्यंत विविध माहिती तो शेअर करत आला आहे. केदार शिंदे याने राज ठाकरेंविषयी केलेली पोस्टही चर्चेत आली होती. त्याने शेअर केलेल्या त्या फोटोमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘महाराष्ट्र शाहीर’ च्या पोस्टरकडे पाहत असल्याचे दिसत आहे. हा फोटो शेअर करताना केदार शिंदेने म्हटलं आहे की, ‘आपल्या कलाकृतीकडे पाहणारा एक अव्वल कलाकार… मनस्वी आनंद.’

शाहीर साबळे यांच्या जन्मशताब्दी वर्षात त्यांना अभिवादन म्हणून त्यांच्या जीवनकार्याचा वेध ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातून घेतला जाणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक केदार शिंदेचं असून पटकथा आणि संवाद प्रतिमा कुलकर्णी यांचे आहेत. शिवाय अजय- अतुल या जोडीचं संगीत या सिनेमाला लाभलं आहे. ‘महाराष्ट्र शाहीर’ या सिनेमात शाहीर साबळे यांच्या भूमिकेत अभिनेता अंकुश चौधरी दिसणार आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात