मुंबई 26 मे: एकीकडे बॉलिवूडचे (Bollywood film star cast)तगडी स्टारकास्ट असलेले चित्रपट दोन चित्रपटांची स्पर्धा नको म्हणून आपल्या चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलत आहेत तर मराठी चित्रपटाची सेम स्टारकास्ट असलेले चित्रपट एकमेकांच्याच पाठोपाठ रिलीज होत आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात असाच प्रकार बघायला मिळाला. एकीकडे प्रसाद ओक यांनी दिग्दर्शित केलेला चंद्रमुखी (Chandramukhi)चित्रपट 29 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आणि अगदी 2 आठवड्याच्या फरकाने प्रसाद ओक यांची मुख्य भूमिका असलेला धर्मवीर (Dharmaveer) चित्रपट बॉक्सऑफिसवर येऊन धडकला. प्रसाद ओकची दोन्ही चित्रपटांचं प्रमोशन करताना तारांबळ झाली. चंद्रमुखीचं प्रमोशन एकीकडे तुफान वेगाने चाललं असताना सलमान खानच्या उपस्थितीत धर्मवीरचा ट्रेलर लाँच झाला. चंद्रमुखी आणि धर्मवीर चित्रपटांची टक्कर प्रेक्षकांचा गोंधळ उडवून देणारी होती.
आता येत्या काळात अशीच टक्कर अजून दोन महत्त्वाच्या मराठी चित्रपटांची होणार आहे. प्रवीण तरडे लिखित दिग्दर्शित गाजणारा चित्रपट धर्मवीर आणि प्रवीण तरडे यांनीच दिग्दर्शन आणि अभिनय केलेला चित्रपट सरसेनापती हंबीरराव (Sarsenapati Hambirrao)यांची जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे. स्वतः प्रवीण तरडे दोन्ही चित्रपटांचं जोरात प्रमोशन करताना दिसत आहेत.
एका अभिनेता, लेखक, दिग्दर्शकासाठी एवढे दोन भव्य मराठी चित्रपट एकाच वेळी येणं अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. पण यामुळे एकूणच मराठीकडे येणारा प्रेक्षक गोंधळून जातो आहे किंवा मराठीमध्येच अनावश्यक स्पर्धा निर्माण होऊन कदाचित प्रत्येक चित्रपटाला दुप्पट मिळणाऱ्या यशाचे वाटे केले जात आहेत आणि परिणामी मराठी चित्रपटांचं कलेक्शन कमी होत आहे या बाजूचा विचार होणं गरजेचं आहे.
यावरच एकूण प्रवीण तरडे ( Pravin Tarde) न्यूज18 लोकमत डिजिटलला दिलेल्या Exclusive मुलाखतीत असं सांगतात, "चित्रपट प्रदर्शनाची तारीख ठरवणं हे सर्वस्वी निर्मात्यांच्या हातात असतं. आपल्याकडे लेखक, दिग्दर्शकांना विश्वासात घेऊन तारीख ठरवणं, त्यांचं मत विचारात घेणं हे चालत नाही त्यामुळे अश्या गोष्टी होतात."
मराठी चित्रपटाचं नाव प्रचंड गाजत आहे. हिंदीमधील कलाकारांकडून मराठी चित्रपटाची दखल घेतली जात आहे. मराठी चित्रपटांची पब्लिसिटीबद्दल असलेली कायमची बोंबाबोंब आणि तक्रार आता नाहीशी होत आहे. चंद्रमुखीसारख्या चित्रपटांनी तर दाखवून दिलं की इतके पैसे आणि वेळ खर्च करून मराठी चित्रपटाचं तगडं प्रमोशन करून चित्रपट यशस्वी होऊ शकतो. वेगवेगळ्या विषयांसह अत्यंत चपखल बसणाऱ्या स्टारकास्टपर्यंत अनेक बदल मराठीमध्ये होत आहेत. असं असतानाही जर दोन मराठी चित्रपटांची एकत्र टक्कर झाली तर मराठी चित्रपटांचंच नुकसान आहे. शिवाय एकच अभिनेता एकाच वेळेला एवढ्या ठिकाणी फिरून दोन्ही कलाकृतींचं प्रमोशन एकत्र करत असतो. त्यालाही सहृदयी एका प्रोजेक्टवर धड लक्ष देता येत नाही.
हे ही वाचा- जान्हवी कपूरच्या May महिन्यातील ग्लॅमरस फोटोंची गॅलरी; पाहा फक्त एका क्लिकवर
चित्रपट प्रदर्शित करताना प्रत्येक बाबींचा विचार व्हावा, प्रत्येकाचं म्हणणं विचारात घेतलं जावं आणि मराठी चित्रपटाचं नाव अधिकाधिक मोठं व्हावं अशीच इच्छा सर्वांची आहे.
एकीकडे मराठी चित्रपटांची लोकप्रियता बघता त्यांना प्राईम टाईम आणि अधिक शोज् मिळावे अशी इच्छा इंडस्ट्रीतूनच वारंवार व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे अश्या पद्धतीने चित्रपट गल्ला करण्यात अयशस्वी व्हावे अशी वेळ येऊ नये.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.