मुंबई, 14 मार्च- यंदाच्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात भारताला दोन ऑस्कर पुरस्कार मिळाले. पहिला ऑस्कर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्ट फिल्मला मिळाला. तर, दुसरा पुरस्कार ‘आरआरआर’ चित्रपटातील ‘नाटू नाटू’ गाण्याला मिळाला. ऑस्कर विजेत्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आता नागराज मंजुळे यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये त्यांचे ऑस्कर कनेक्शन सांगितलं आहे.
नागराज मंजुळे यांनी फेसबूकवर पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ऑस्कर विजेत्यांचं त्यांच्या चित्रपटांबरोबर असलेलं कनेक्शन सांगितलं आहे. या वर्षीचा ऑस्कर विजेता भारतीय माहितीपट elephant whisper माझी मैत्रीण संचारीनं एडिट केला आहे.
वाचा-शमा सिंकदरच्या बॉडी सूटमधील फोटोंनी वाढवला सोशल मीडियाचा पारा!
‘नाळ’ ही संचारीनंच एडिट केली आहे. सुधाकर आणि संचारी खूप खूप प्रेम आणि सदिच्छा. विशेष म्हणजे ‘नाटू नाटू’ गाण्याचे गीतकार चंद्रबोस यांनीच GBB मधल्या ‘गुन गुन’ गाण्याचे तेलगू बोल लिहिले आहेत. यावेळच ऑस्कर कनेक्शन असं आहे. चांगभलं!” असं नागराज यांनी फेसबूक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
नागराज मंजुळेनं देखील यंदाच्या ऑस्करशी खास कनेक्शन आहे हे सांगत लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली. नागराज यांच्या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत सर तुमच्याकडून ऑस्करची अपेक्षा असल्याची इच्छा व्यक्त केली आहे.
आरआरआर सिनेमातील 'नाटू नाटू'या गाण्याने यंदाचा बेस्ट ओरिजिनल साँग कॅटेगिरीत ऑस्कर जिंकला आहे. नाटू नाटू या गाण्यानं लेडी गागा आणि री-रीच्या गाण्यांना मागे टाकलं आहे. अप्लॉज, होल्ड माय हँड, लिफ्ट मी अप आणि दिस इज ए लाइफ या गाण्यांना मागे टाकत 'नाटू नाटू' ने ऑस्कर पटकावला आहे. नाटू नाटू गाण्याने ऑस्कर जिंकणं ही भारतीय सिनेमासाठी खूप गर्वाची बाब आहे.
एसएस राजामौली यांच्या 'आरआरआर' चित्रपटातील 'नाटू नाटू' या गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा ऑस्कर पुरस्कार मिळाला आहे. भारतासाठी हा अत्यंत ऐतिहासिक क्षण आहे. 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये भारताने दोन ऑस्कर जिंकले आहेत. राजामौली यांनी 'नाटू नाटू' जागतिक पातळीवर नेण्यात कोणतीही कसर सोडली नव्हती. गायक ए.आर. रहमाननेही म्हटले होते की, 'नाटू नाटू'ने ऑस्कर जिंकावे, कारण तो आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या देशाच्या संस्कृतीचा विजय असेल. नाटू नाटू हे गाणं अभिनेता राम चरण आणि ज्युनिअर एनटीआर यांच्यावर चित्रीत करण्यात आलं आहे. 2022मध्ये नाटूनाटू गाण्यानं सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला. नाटूनाटूची हुक स्टेप सोशल मीडियावर चांगलीच हिट झाली होती. नाटू नाटू या गाण्याला काही दिवसांआधीच गोल्डन ग्लोब अवॉर्ड देखील मिळाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.