• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनाने घेतला दोन जवळच्या व्यक्तींचा बळी

श्रेया बुगडेवर कोसळला दु:खाचा डोंगर, कोरोनाने घेतला दोन जवळच्या व्यक्तींचा बळी

‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya) च्या माध्यमातून श्रेया नेहमीच लोकांना हसवायचं काम करत असते. मात्र तिला किती दु:ख आहे. हे तिने लपवून ठेवलं होतं.

 • Share this:
  मुंबई, 19 मे :  प्रत्येक कलाकार आपल्या कलेने लोकांचं मनोरंजन करत असतो. मात्र आपण कधी कधी विसरून जातो, की या लोकांना सुद्धा मन असतं, यांना सुद्धा भावना असतात आणि यांनाही दु:ख होतं. हे कलाकार आपलं दु:ख लपवून पडद्यावर जगत असतात. असचं काहीसं श्रेया बुगडेच्या (Shreya Bugade) बाबतीत पाहायला मिळालं. ‘चला हवा येऊ द्या’ (Chala Hava Yeu Dya)  च्या माध्यमातून श्रेया नेहमीच लोकांना हसवायचं काम करत असते. मात्र तिला किती दु:ख आहे. हे तिने लपवून ठेवलं होतं.
  हवा येऊ द्याचं शुटींग सध्या जयपूरमध्ये सुरू आहे. नुकतचं हवा येऊ द्याचा एक भाग पार पडला. यामध्ये स्वप्नीलने एका दुखद गोष्टीचा खुलासा केला. श्रेयाने नुकतंच आपल्या 2 लाडक्या मावशींना गमावलं आहे. या दोघींना कोरोनाची लागण झाली होती.
  याबद्दल बोलताना श्रेयाने म्हटलं, ‘या दोन्ही मावशींना कोरोनाची लागण झाली होती. अवघ्या 24 तासांमध्ये या दोघींचं निधन झालं. तसंच श्रेयाने म्हटलं आहे, या दोन्ही मावशीसोबत श्रेयाचं खूप घट्ट नातं होतं. श्रेया त्यांची खूपचं लाडकी होती. मात्र त्यांच्या या अशा जाण्यानं श्रेया व तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगरचं कोसळला आहे. (हे वाचा:प्रसिद्ध अभिनेत्याच्या नावाचा वापर करून मुलींकडे केली न्यूड फोटोंची मागणी) श्रेयाने नुकतंच मदर्स डे दिवशी आपल्या आई आणि दोन्ही मावशींसोबतचा आपला बालपणीचा फोटो शेयर केला होता. यातूनचं श्रेयाचं त्यांचावर असणारं प्रेम दिसून येत होतं. जेव्हा स्वप्नीलने कार्यक्रमात या घटनेचा खुलासा केला, तेव्हा श्रेयाला ही आपल्या भावना आवरता आल्या नाहीत, तिने सेटवर आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. (हे वाचा:Happy Birthday:'किराणा दुकानात काम ते प्रसिद्ध लेखक' रस्किन बॉन्ड यांचा प्रवास) मात्र खाजगी आयुष्यात इतकं दु:ख असताना प्रेक्षकांना जराही सुगावा न लागू देता हसवणाऱ्या श्रेयाचं सगळ्यांचं कौतुक वाटत आहे.
  Published by:Aiman Desai
  First published: