मुंबई, 2एप्रिल- गेली वर्षभर सर्वजण कोरोनाचा फटका सहन करत आहेत. मध्यंतरी काही महीन्यांपूर्वी कोरोनाचा हाहाकार कमी होताना दिसत होता. त्यामुळे लॉकडाऊनचे नियम शिथिल (Corona lockdown) करून बऱ्यापैकी कामांना सुरुवात झाली होती. त्यात मालिका आणि चित्रपटांच्या चित्रिकरणाला सुद्धा सुरुवात झाली होती. मात्र काही दिवसांपासून पुन्हा कोरोनाचा तडाखा वाढलेला दिसत आहे. आणि या तडाख्यात कलाकार मंडळीसुद्धा आलेले दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झालेलं समोर येतं आहे. त्यामुळे इतर कलाकार मंडळीसुद्धा योग्य ती खबरदारी घेताना दिसून येतं आहेत. हीच खबरदारी घेत मराठी अभिनेता सुबोध भावेनं (Subodh Bhave taking corona vaccine) आज पत्नी मंजिरीसह (Subodh bhave wife) कोरोना लस घेतली आहे.
याआधी देशात केवळ सार्वजनिक आरोग्य कर्मचारी आणि वृद्धांना लस दिली जात होती. मात्र आज 1 एप्रिलपासून लसिकारणात महत्वाचा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार केंद्र सरकारने वयवर्ष 45 पूर्ण केलेल्या पुढच्या व्यक्तींना लसीकरण देण्यास परवानगी दिली आहे. आणि आज अभिनेता सुबोध भावे यानं आपल्या पत्नीसह जाऊन कोरोनाचं लसीकरण केलं आहे. सुबोधनं स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला पत्नीसह फोटो पोस्ट करत सर्वांना ही माहिती दिली आहे. ही पोस्ट करत सुबोधनं एक महत्वाचं असं कॅप्शन देखील लिहिली आहे. त्यात तिनं म्हटलं आहे. ‘लस घेतली तरी काळजी घ्यायचीच आहे.’ काही दिवसांपूर्वी सुबोध त्याची पत्नी आणि मुलाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. मात्र वेळीच त्याने योग्य ती खबरदारी घेत, ही लढाई यशस्वीपणे लढली होती. आणि आत्ता खबरदारी म्हणून सुबोधनं लसही घेऊन टाकली आहे. (हे वाचा: मलायका अरोराने घेतली Corona Vaccine; लसीकरणानंतर चाहत्यांना दिला एक खास संदेश ) सुबोध भावे मराठीतला एक गुणवंत कलाकार म्हणून ओळखला जातो. त्याच्या प्रत्येक अभिनयात एक वेगळेपणा जाणवतो. सुबोधला हाडाचा कलाकार म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. ‘तुला पहिले रे’ या मालिकेच्या उत्तुंग यशानंतर सुबोध सध्या ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत काम करत आहे. यात सुबोध नकारत्मक भूमिका साकारत आहे. काही दिवसांपूर्वीच या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले आहेत.

)







