मुंबई, 30 जून- आपल्या आवाजाने सर्वांनाचं मंत्रमुग्ध करणारे गायक (Singer) मिलिंद इंगळे (Milind Ingale) आत्ता एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. आजवर त्यांनी आपल्या आवजाने रसिकांच्या कानांना तृप्त केलं आहे. आत्ता ते आपल्या खवय्यांच्या जिभेला तृप्त करण्यासाठी येत आहेत. ‘गवय्या ते खवय्या’(Gavaiyya Te Khavaiyya) या आगळ्यावेगळ्या माध्यमातून ते आपल्याला भेटणार आहेत. यानिमित्ताने ते आपल्या पाककलेचं सादरीकरण करणार आहेत.
मिलिंद इंगळे हे मराठीतील एक उत्कृष्ट गायक म्हणून ओळखले जातात. आजपर्यंत त्यांनी आपल्या गोड गळ्याने सर्वांना भुरळ पाडली आहे. मात्र आत्ता ते गाण्याच्या नाही तर खाण्याच्या माध्यमातून चाहत्यांना भेटणार आहेत. फारच कमी लोकांना माहिती आहे, की मिलिंद हे एक उत्तम शेफसुद्धा आहेत. आणि याचीच झलक ते आपल्या आगामी शोमधून दाखवणारं आहेत. 1 जुलैपासून मिलिंद इंगळे यांचा यूट्यूब शो ‘गवय्या ते खवय्या’ आपल्या भेटीला येत आहे. यातून ते चाहत्यांच्या जिभेला तृप्त करणार आहेत.
(हे वाचा:अमृता खानविलकरची हेल्दी रेसिपी; VIDEO पाहूनच तोंडाला सुटेल पाणी )
मिलिंद इंगळे वेगवेगळ्या खमंग पाककृती आपल्या युट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून ते सादर करणार आहेत. आणि या रेसिपींच्या जोडीला असणार आहे त्यांच्या सुपरहिट गाण्यांची मेजवानी. मिलिंद हे आपल्याला पाककृती शिकवत शिकवत एकापेक्षा एक सुंदर गाणीसुद्धा गावून दाखवणारं आहेत.
(हे वाचा:VIDEO: शालिनी-अनिलचा नवा कट; जयदीपच्या जीवावर बेतणार?)
1998 मध्ये आलेल्या मिलिंद इंगळेच्या ‘गारवा’ या गाण्याने श्रोत्यांवर गारुड घातल होतं. तसेच ‘छुई मुई सी लगती हो’ या गाण्यानेसुद्धा सुपरहिटची पावती मिळवली होती. अशा पद्धतीने अनेक हिट गाणी देवून त्यांनी आपली विशिष्ट ओळख निर्माण केली आहे. आत्ता गाणं आणि खाणं या दोन्हींचा मध्य साधणाऱ्या ‘गवय्या ते खवय्या’ या शोची सर्वच चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Milind ingle, Singer