मुंबई 3 मे: टीव्हीवरील लोकप्रिय विनोदी मालिका ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ (tarak mehta ka ultah chashma) गेल्या 13 वर्षांपासून भारतीय प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेचा मोठा चाहता वर्ग आहे. यातील गोकुलधाम सोसायटी आणि तिथं राहणारी कुटुंब लोकांच्या चेहऱ्यावर निखळ हास्य फुलवतात. या मालिकेतील एक महत्वाचं पात्र म्हणजे जेठालालची पत्नी दयाबेन. दयाबेनची भूमिका साकारणाऱ्या दिशा वाकानी (Disha Vakani)गेल्या तीन वर्षांपासून मालिकेत दिसत नाही आहे. त्यामुळे दयाबेनची मालिकेत पुन्हा कधी एंट्री होणार याबाबत नेहमीच विचारलं जातं. तर दया बेनच्या वापसीवर मालिकेचे निर्माते असित मोदी (Asit Modi)यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की दिशा वाकानी यांना जर ही मालिका सोडायची असेल, तर मालिका नव्या अभिनेत्रीसह (New Actress) पुढे जाईल. आतापर्यंत अनेकदा असित यांना दिशाच्या परतण्याबद्दल विचारलं गेलं. मात्र,असित दिशा पुन्हा येतील,अशीच उत्तरं द्यायचे. मात्र,आता त्यांनी स्पष्ट सांगितलंय की दिशाने मालिका सोडल्यास आम्ही दयाबेनच्या भूमिकेसाठी नव्या अभिनेत्रीची निवड करू. तसेच ते म्हणाले,की सध्या मालिकेत दयाबेनचं परतणं आणि पोपटलालच्या लग्नापेक्षा बऱ्याच महत्वाच्या गोष्टी आहेत. या महामारीत इतर अनेक चांगले विषय आम्ही या मालिकेतून मांडण्याचा प्रयत्न करतोय. तसेच कलाकारांना अडचणी भासू नयेत,यासाठी कलाकारांच्या सुरक्षिततेची काळजी घेऊन शूटिंग कसं करता येईल,याबद्दल आम्ही विचार करतोय. यासाठी बायो बबल फॉरमॅट(Bio Bubble Format)(म्हणजेच जैव सुरक्षित वातावरण) चांगला पर्याय आहे, यासाठी परवानगी मिळाल्यास आम्ही त्यानुसार काम करू,असं असित मोदींनी सांगितलं. ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीवर बच्चन कुटुंबीय चिडतात; श्वेता नंदानं केली पोलखोल दयाबेनची भूमिका साकारणारी दिशा वकानी 2017 मध्ये मॅटर्निटी लिव्ह म्हणजेच प्रसूती रजेवर (Maternity leave)गेली होती. त्यानंतर ती केवळ एकाच एपिसोडमध्ये पुन्हा दिसली. त्यामुळे दिशा पुन्हा मालिकेत परतणार की नाही, याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, नीला फिल्म प्रॉडक्शन्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत लोकप्रिय मालिका तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) आता त्यांच्या अधिकृत युट्युब चॅनेलवर मराठीमध्ये ‘गोकुळधामची दुनियादारी’ आणि तेलगुमध्ये ‘तारक मामा अय्यो रामा’ या नावाने उपलब्ध आहे. तारक मेहता काउल्टा चष्मा ही जगातील सर्वाधिक काळ दररोज प्रक्षेपित होणारी कॉमेडी मालिका ठरली असून यातील बहुतांश कलाकारांची नावे भारतात आणि इतर अनेक देशांत घरोघरी पोहचली आहेत. 2008मध्ये पहिल्यांदा प्रक्षेपित झालेला TMKOC कार्यक्रम 13 व्यावर्षातही सुरू आहे आणि या कालावधीत त्याचे 3100 हून अधिक एपिसोड प्रक्षेपित झाले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.