प्रिया बापट आणि तिची बहीण श्वेता यांचा सावेंची असा ब्रँड आहे. हा एक साडीचा ब्रँड असून याला मिळणाऱ्या तुफान प्रतिसादाबद्दल प्रिया भलतीच खुश आहे.
तेजस्विनी पंडित आणि अभिज्ञा भावे यांच्या तेजाज्ञा या ब्रँडला विसरून चालणार नाही. खण आणि महाराष्ट्रातील पारंपरिक पद्धतीच्या कापडांचे कुर्ते आणि साड्या इथे उपलब्ध आहेत. नुकत्याच या ब्रँडला 7 वर्ष पूर्ण झाली.
आरती वडगबाळकर या अभिनेत्रीचा सुद्धा 'कलरछाप' नावाचा स्वतःचा ब्रँड आहे. सुटसुटीत कॉटनचे ड्रेस, साड्या ही त्यांची खासियत आहे.
गिरीजा ओक-गोडबोले या अभिनेत्रीने सुद्धा अत्यंत भन्नाट असा 'फ्रेश लाईम सोडा' नावाचा कपड्यांचा ब्रँड सुरु केला आहे.