मातृभाषेसाठी महाराष्ट्राच्या अप्सरेची धडपड; सोनाली कुलकर्णीने घेतला मोठा निर्णय

आपली मातृभाषा जपण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (sonali kulkarni) करिअरमधील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

आपली मातृभाषा जपण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनं (sonali kulkarni) करिअरमधील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे.

  • Share this:
    मुंबई, 24 डिसेंबर : आपल्या दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ करणारी महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णी (sonali kulkarni). तिनं आता एक मोठा निर्णय घेतला आहे आणि सर्वांची मनं पुन्हा जिंकली आहेत. सोनालीनं आपलं मराठी भाषेवर किती प्रेम आहे हे दाखवून दिलं आहे. आपली मातृभाषा जपण्यासाठी मराठमोळी अभिनेत्री सोनालीनं डान्सिंग करिअरमधील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. सोनाली यापुढे मराठी कार्यक्रमांमध्ये हिंदी गाण्यांवर डान्स करणार नाही. डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज’ या डान्स रिअॅलिटी शोमध्ये तिनं आपला हा निर्णय जाहीर केला. डान्सिंग क्वीन साईज लार्ज-फुलचार्ज या शोमध्ये सोनाली परीक्षक आहे.
    डान्सिंग क्वीनच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या कार्यक्रमात सोनालीने तिच्याच गाण्यांवर वेगळ्या स्टाइलमध्ये डान्स केला. दरम्यान लवकरच या डान्स शोचा ग्रँड फिनाले प्रदर्शित होणार आहे. हे वाचा - अरे देवा ! ...म्हणून संतोष जुवेकरला मायदेशापासून रहावं लागणार दूर सोनाली तिच्या आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनला गेली होती. नुकतीच ती लंडनहून परतली आहे. या सिनेमात सोनाली कुलकर्णी सोबत हेमंत ढोमे, संतोष जुवेकर आहे. दिग्दर्शन लोकेश गुप्ते हे या चित्रपटाच दिग्दर्शन करणार आहेत. अमेय खोपकर, स्वाती खोपकर हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. हे वाचा - VIDEO ...आदित्य कश्यप आता तरी माझा होशील ना? लग्नात सईने घेतला भन्नाट उखाणा वैयक्तिक आयुष्याबाबत म्हणायचं तर सोनाली कुलकर्णीनं दुबईमध्ये राहणाऱ्या कुणाल बेनोडेकरशी साखरपुडा केला आहे.  2 फेब्रुवारीला सोनालीचा साखरपुडा झाला. याची अधिकृत घोषणा सोनालीने आपल्या वाढदिवशी केली. 18 मे रोजी आपल्या सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिनं चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. सोनाली कुलकर्णी हिच्या लग्नाविषयी याआधी अनेक अफवा पसरल्या होत्या. कोल्हापूरच्या एका मोठ्या राजकीय व्यक्तीशी तिचं लग्न झाल्याच्या बातम्या वेगाने पसरत होत्या.
    Published by:Priya Lad
    First published: