VIDEO ...आदित्य कश्यप आता तरी माझा होशील ना? लग्नात सईने घेतला भन्नाट उखाणा
ज्या क्षणाची प्रेक्षक आतुरतेनं वाट बघत होते तो क्षण आता आला आहे. माझा होशील ना (Majha Hoshil Na) या मालिकेत आदित्य आणि सईचा लग्नसोहळा लवकरच पार पडणार आहे.
मुंबई, 24 डिसेंबर: माझा होशील ना (Majha Hoshil Na) ही मालिका बघता बघता प्रेक्षकांच्या गळातली ताईत झाली आहे. प्रेक्षकांना आता आदित्य आणि सईच्या लग्नाची उत्सुकता लागून राहिली आहे. मेघनाशी लग्न करायला निघालेल्या आदित्यला (Virajas Kulkarni) सईने (Gautami Deshpande) दापोलीमध्ये गाठलं आणि तिचं प्रेम व्यक्त केलं पण मामांचा मान राखयचा म्हणून त्याग भावनेने आदित्याने तिच्यासोबत लग्नाला नकार दिला.
माझा होशील ना या मालिकेत लवकरच असं वळण येणार आहे की, त्या दोघांचं लवकरच लग्न होणार आहे. आता आदित्यने लग्न करायला नकार देऊनसुद्धा त्याच्या दोघांच्या लग्नाचे प्रोमो आपल्याला पाहायला मिळत आहेत. मग हे स्वप्न आहे का? तर तसं नाही. आदित्य आणि सईचं खरोखरच लग्न होणार आहे आणि हा लग्नसोहळा पाहण्यासाठी प्रेक्षकांना फारशी वाट बघण्याचीही गरज नाही. लग्नाच्या वेळी सईने आदित्यसाठी मस्त उखाणाही घेतला.