मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /मानलं! सोनाली कुलकर्णीने नाही लपवली चेहऱ्यावरच्या डागांची समस्या; No Makeup look ची चर्चा!

मानलं! सोनाली कुलकर्णीने नाही लपवली चेहऱ्यावरच्या डागांची समस्या; No Makeup look ची चर्चा!

Sonalee Kulkarni No makeup Look: 'तुमच्या त्वचेवर कितीही पिंपल्स येऊ देत, आपल्या चेहऱ्याची कोणतीही लाज बाळगू नका. कधीकधी स्वतः वर सुद्धा प्रेम करा.'

Sonalee Kulkarni No makeup Look: 'तुमच्या त्वचेवर कितीही पिंपल्स येऊ देत, आपल्या चेहऱ्याची कोणतीही लाज बाळगू नका. कधीकधी स्वतः वर सुद्धा प्रेम करा.'

Sonalee Kulkarni No makeup Look: 'तुमच्या त्वचेवर कितीही पिंपल्स येऊ देत, आपल्या चेहऱ्याची कोणतीही लाज बाळगू नका. कधीकधी स्वतः वर सुद्धा प्रेम करा.'

मुंबई, 8 एप्रिल- प्रत्येक तरुणींना आपल्या चेहऱ्याची जीवापाड काळजी असते. अनेक तरुणी आपल्या त्वचेसाठी हजोरो रुपयेसुद्धा खर्च करण्यास मागे पुढे बघत नाहीत. चेहरा सुंदर आणि नितळ(pure skin) दिसण्यासाठी हवं ते करतात. तर दुसरीकडे अनेक तरुणी अफाट पैसा(lots of money) खर्च करूनही पिंपल्स(pimples) आणि चेहऱ्यावर पडणाऱ्या डागांनी (scars) त्रस्त असतात. मात्र पिंपल्स आणि चेहऱ्यावर पडणाऱ्या डागांच्या समस्येने फक्त सर्व सामान्य तरुणीच त्रस्त नसतात तर अभिनेत्री सुद्धा या समस्यांना तोंड देत असतात. सध्या अशाच समस्येला तोंड देणारी एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी(sonalee kulkarni pimple problem) ही होय. तिचा no makeup look सोशल मीडियावर गाजतो आहे. तिच्या पारदर्शकतेचं, धाडसाचं आणि आत्मविश्वासाचं कौतुक होतंय.

सोनाली कुलकर्णीने गेल्या वर्षी म्हणजेच 6 एप्रिल 2020 मध्ये आपला एक फोटो पोस्ट केला होता. आणि तोसुद्धा विना मेकअपचा. त्यात सोनालीच्या चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात लालसर चट्टे दिसून येत होते. त्या फोटोच्या खाली माहिती देत सोनालीनं म्हटलं होतं. की ती ‘नटरंग’ चित्रपटापासूनच चेहऱ्याच्या या विविध समस्येला तोंड देत आहे. तिच्या चेहऱ्यावर भयानक लाल चट्टे आणि पिंपल्स येत आहेत. या समस्येमुळे तिने आपल्या हातातील अनेक चित्रपट सुद्धा गमावले आहेत. त्यामुळे तिची भयानक चिडचिड होत होती. इतकंच नव्हे तर ती या समस्येमुळे मानसिक आजाराला सुद्धा बळी पडली होती.

मात्र नंतर तिनं स्वतः या समस्येचा स्वीकार केला आहे. याबद्दल बोलताना ती म्हणते, तुमची त्वचा जशी असेल तसा तिचा स्वीकार करा. जेव्हा तुम्ही स्वतः या गोष्टी स्वीकारू लागता. तेव्हा तुम्ही या अडचणींवर मात करून, विजय मिळवू शकता. तुमच्या त्वचेवर कितीही पिंपल्स येऊ देत, तुमच्या त्वचेवर कितीही लालसर चट्टे येऊदेत किंवा अन्य कोणतीही त्वचेची समस्या होऊदे. मात्र तुम्ही आपल्या चेहऱ्याची कोणतीही लाज बाळगू नका. कधीकधी स्वतः वर सुद्धा प्रेम करा. आपल्या चेहऱ्याच्या प्रत्येक समस्येचा हसून स्वीकार करा. तुम्हाला जशी त्वचा मिळाली आहे तुम्ही तिचा स्वीकार करा आणि आभार व्यक्त करा.

आज काही महिन्यानंतर सोनालीनं परत एक फोटो पोस्ट केला आहे. त्यातसुद्धा ती विना मेकअपची दिसतेय. त्यातसुद्धा तिच्या चेहऱ्यावर थोडे लाल चट्टे दिसत आहेत. याबद्दल बोलताना तिनं म्हटलं आहे. गेल्या चार महिन्यांपासून माझ्या चेहऱ्यावर उपचार चालू असून, माझा त्वचेत मोठा फरक जाणवत आहे. आता अजून 3 महिने शिल्लक आहेत. तिने उपचारासाठी मदत करणाऱ्या तज्ञाचं आभार देखील व्यक्त केले आहेत.(हे वाचा: शशांक केतकरची बहीणही मालिकेत दिसणार; न्यूयॉर्कमध्ये घेतलेत अभिनयाचे धडे)

नुकताच सोनाली ‘झिम्मा’ च्या ट्रेलरमध्ये झळकली होती. स्त्रियांच्या अवतीभोवती फिरणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरला भरघोस प्रतिसाद मिळाला होता. तसेच काही दिवसांपूर्वी सोनालीला ‘हिरकणी’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार सुद्धा मिळाला आहे. त्याचबरोबर सोनाली आगामी काळात’छत्रपती ताराराणी’ या ऐतिहासिक चित्रपटात झळकणार आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi cinema, Marathi entertainment, Sonalee Kulkarni