जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात' महिला दिनी सोनाली कुलकर्णीची लक्षवेधी पोस्ट

'स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात' महिला दिनी सोनाली कुलकर्णीची लक्षवेधी पोस्ट

'स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात' महिला दिनी सोनाली कुलकर्णीची लक्षवेधी पोस्ट

मराठी मनोरंजन विश्वातील अघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील महिला दिनानिमित्त तिचे खास फोटो शेअर केले आहेत. शिवाय तिनं एक पोस्ट देखील लिहिली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 8 मार्च- आज जागतिक महिला दिन आहे. मनोरंजन विश्वातील कलकारांनी देखील सोशल मीडियाचा आधार घेत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मराठी मनोरंजन विश्वातील अघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिनं देखील महिला दिनानिमित्त तिचे खास फोटो शेअर केले आहेत. शिवाय तिनं एक पोस्ट देखील लिहिली आहे. सध्या सोनालीची ही पोस्ट सर्वांचे लक्षवेधून घेत आहे. सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या मोगलमर्दिनी ताराराणी सिनेमाचा टिझर रिलीज झालाय. यात सोनाली महाराणी ताराराणी यांच्या भुमिकेत दिसणार आहे. यानिमित्त तिने तिचे काही सुंदर फोटो पोस्ट करत लिहिलयं की, “भारतीय इतिहासातील दमदार पात्रांपैकी एक असलेल्या या स्त्रीला पोर्तुगीजांनी ‘रैन्हा डोस मराठे’ किंवा ‘मराठ्यांची राणी’ असेही संबोधले होते. वाचा- ‘तारक मेहता’ फेम पोपटलालची ऑनस्क्रीन पत्नी सध्या जगतेय असं आयुष्य महाराणी ताराबाई भोसले या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सून, सरसेनापती हंबीररावांच्या शूर कन्या आणि भारतातील सर्वात महान मध्ययुगीन सम्राटांपैकी एक आहेत.अफाट ताकदीने आणि इच्छाशक्तीच्या जोरावर राज्य वाचवणाऱ्या इतिहासातील मोजक्या महिलांपैकी ताराबाईंच्या अदम्य धाडसाला आणि अदम्य वृत्तीला सलाम करावा लागेल. मराठ्यांचा उदय-अस्त पाहणारी स्त्री.”

जाहिरात

पुढे सोनाली लिहिते, “आपल्या राज्याप्रती अत्यंत समर्पित असलेल्या अदम्य योद्धा महाराणी ताराबाईंनी मराठा महासंघाला अगदी खालच्या पातळीवर असताना विघटित होण्यापासून रोखले नाही तर राष्ट्रीय सत्तेपर्यंत पोहोचण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. या एकट्यानं जगातील सर्वात पराक्रमी शासक औरंगजेबाच्या प्रचंड सैन्याविरुद्ध मराठ्यांचा प्रतिकार केला.”

News18लोकमत
News18लोकमत

मी हा #जागतिकमहिलादिन त्यांना आणि त्यांच्या सारख्या स्त्रियांना समर्पित करते ज्या केवळ स्वतःसाठीच नाही तर आपल्या माणसांसाठी लढतात.‘सोनालीची ही पोस्ट व्हायरल झाली असून तिच्या लिखाणाचे कौतुक होत आहे. चाहत्यांनी तिला कमेंट करत महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात