मुंबई,8 मार्च- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा' गेल्या 14 वर्षांपासून प्रेक्षकांचं भरभरुन मनोरंजन करत आहे. या शोने प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलं आहे. आजही हा शो टीव्हीच्या टॉप शोच्या यादीत समाविष्ट आहे. 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये असे काही कलाकार आहेत जे आज पडद्यापासून दूर गुपित आयुष्य जगत आहेत. अनेकांना त्यांच्याबाबत जाणून घेण्याची उत्सुकता आहे. त्यापैकीच एक अभिनेत्री म्हणजे तान्या गुप्ता.
'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये एकापाठोपाठ एक अनेक कलाकारांनी या शोला रामराम ठोकला आहे. बऱ्याच दिवसांपासून 'दयाबेन' शोमध्ये पुनरागमन करणार असल्याचीही चर्चा आहे. या शोमध्ये पुन्हा एकदा दयाबेनला पाहण्यासाठी चाहतेही आतुरतेने वाट पाहात आहेत. नुकतंच 'दयाबेन'ची आठवण काढत 'जेठालाल'नेही एक भावनिक पोस्ट लिहिली होती. याच लोकप्रिय शोमधून गायब झालेली एक व्यक्तिरेखा म्हणजे अभिनेत्री तान्या गुप्ता होय.
(हे वाचा: Holi 2023: अंकिता लोखंडेने दिली होळीची जंगी पार्टी; पतीसोबत बेभान होऊन रंग खेळताना दिसली अभिनेत्री)
'तारक मेहता का उल्टा चष्मा' या शोमध्ये प्रत्येक पात्र लोकांना भुरळ पाडण्यात यशस्वी ठरत आहे.प्रेक्षक मालिकेतील प्रत्येक पात्राला भरभरुन प्रेम देतात. या शोमध्ये काही काळापूर्वी तान्या गुप्तानेही एन्ट्री घेतली होती. एका एपिसोडमध्ये ती पोपटलालसोबत लग्न करताना दिसून आली होती. पोपटलालसोबत लग्नानंतर ती त्यांना लुटते असा हा मजेशीर सीन होता.परंतु आता ही अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून पडद्यावर दिसलेली नाहीय. सांगायचं झालं तर, आता ती कंटेंट क्रिएटर बनली आहे. नुकतंच तान्या गुप्ताची एक मुलाखत व्हायरल झाली होती, जमध्ये तिने अनेक खुलासे केले होते.
तान्याने या मुलाखतीत खुलासा करत सांगितलं होतं की, 'आयुष्यात एक काळ असा आला होता की, तिच्याजवळ कोणतंही काम नव्हतं. ती एकटी पडली होती. आणि तिला काम मिळणं पूर्णपणे बंद झालं होतं. वयाच्या 12 व्या वर्षांपासून इंडस्ट्रीत काम करत असूनसुद्धा कामासाठी धडपडावं लागलं होतं. याकाळात तिला कुटुंबाने साथ दिली होती. एक दिवस तिला 'तारक मेहता का उल्टा चष्मा'च्या मेकर्सचा फोन आला . आणि तिला भेटण्यासाठी बोलावलं. आणि हा शो तिला मिळालासुद्धा. या टीमसोबत काम करताना आपल्याला प्रचंड मजा आल्याचंही तान्याने सांगितलं आहे.
सोबतच तान्याने आपण पुन्हा 'तारक मेहता'मध्ये दिसणार नसल्याचं सांगितलं आहे. आपली भूमिका त्या ठराविक एपिसोड पुरताच मर्यादित असल्याचं तिने स्पष्ट केलं आहे. दरम्यान आपल्याला पुन्हा या शोमध्ये बोलावण्यात आलं तर आपण काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं तान्याने म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Tarak mehta ka ooltah chashmah, Tv actress