जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Ufff! Priya Bapat चं नवं फोटोशूट पाहून चाहते घायाळ, केली खास कमेंट

Ufff! Priya Bapat चं नवं फोटोशूट पाहून चाहते घायाळ, केली खास कमेंट

Priya Bapat

Priya Bapat

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट(Priya Bapat ). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असून प्रिया सोशल मीडियावर(Social Media) बरीच सक्रीय असते. नुकतंच प्रियाने नवं फोटोशुट (PhotoShoot) केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 13 मार्च: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे प्रिया बापट(Priya Bapat ). उत्तम अभिनयसोबतच प्रिया तिच्या सौंदर्यामुळेही चर्चेत असते. प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री असून प्रिया सोशल मीडियावर(Social Media) बरीच सक्रीय असते. नुकतंच प्रियाने नवं फोटोशुट (PhotoShoot) केले आहे. या नव्या लूकमध्ये प्रिया प्रचंड ग्लॅमरस दिसत आहे. सोशल मीडियावर प्रिया बापट बरीच अ‍ॅक्टिव्ह आहे. ती नेहमी आपल्या आगामी प्रोजेक्टबद्दल अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून देत असते. दरम्यान, प्रियाने हॉट आणि बोल्ड अंदाजात फोटोशूट करत साऱ्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे. अभिनेत्री प्रिया बापट वेगवेगळे ट्रेंड फॉलो करताना दिसते. आताही तिने असेच हटके स्टाईलचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेत. प्रियाने ग्रीन कलरच्या ब्रालेट टॉपवरचे फोटो इन्स्टाला शेअर केलेत. या तिच्या फोटोला अनेकांनी पसंती दिली आहे. प्रियाने परिधान केलेल्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य अधिकच खुलून आले आहे.

जाहिरात

तिच्या या फोटोला तिने ग्रीन हार्ट कॅप्शन दिलं आहे. एका चाहत्याने तिच्या फोटोवर कमेंट करत कोणी उफ्फ तर कोणी “झकास जमलंय!”, अशा हटके कमेंट्स केल्या आहेत. तिच्या या फोटोला 40 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रियाच्या चाहत्यांना तिचा प्रत्येक लुक पसंत पडतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात