जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'दे दणादण' चित्रपटातील 'आवडाक्का' काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

'दे दणादण' चित्रपटातील 'आवडाक्का' काळाच्या पडद्याआड, अभिनेत्री प्रेमा किरण यांचं निधन

Prema Kiran

Prema Kiran

मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे आज (1 मे) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 1 मे: मराठी मनोरंजन विश्वातील ज्येष्ठ अभिनेत्री प्रेमा किरण (Prema Kiran) यांचे आज (1 मे) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ यांच्यासोबतचे त्यांचे चित्रपट प्रचंड गाजले होते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेला ‘हे तर काहीच नाय’ (He Tar Kahich Nay) या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी दे देणादण चित्रपटातील गंमतीशीर किस्से सांगितले होते. त्यांनी नारायण देऊळगावकर यांनी दिग्दर्शित आणि महेश कोठारे यांची निर्मिती असलेला दे दणादण या चित्रपटाविषयी गप्पा मारल्या. त्यावेळी प्रेमा यांनी मजेशीर गमती जमती सांगत ‘मी पडले म्हणून दे दणादण हा चित्रपट हिट झाला’ असे वक्तव्य केले होते. प्रेमा किरण हा किस्सा सांगताना म्हणाल्या, ‘पोलीस वाल्या सायकल वाल्या’ या गाण्याच्या शूटिंगवेळी महेश कोठारे यांनी आम्हाला दुपारच्या आत हे गाणं संपवायचं, अशी ताकीद दिली होती. त्यानंतर या गाण्याचं शूटिंग देखील सुरु झालं. मात्र, शूटिंग सुरू असताना लक्ष्मीकांत बेर्डे यांना सायकल नीट चालवता येत नव्हती. अवघी दोन दोन पावलं पुढे जाऊन लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेमा यांना खाली पाडलं. या चित्रपटाध्ये प्रेमा किरण या सायकलीवरून चक्क तीन वेळा पडल्या होत्या. चित्रपटाचा हा किस्सा सांगताना त्या गमतीने म्हणाल्या, ‘मी तीनवेळा पडले म्हणून सिनेमा हिट झाला’, हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये एकच हशा पिकला होता. त्यांचा हा किस्सा सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत होता. प्रेमा किरण या अभिनेत्रीच नाही, तर निर्मात्या देखील होत्या. 1989 मध्ये आलेल्या ‘उतावळा नवरा’ या चित्रपटाची निर्मिती त्यांनीच केली होती. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई देखील केली होती. नुकतेच त्यांच्या एकुलत्या एक मुलाचे देखील निधन झाले होते. यामुळे त्या एकट्या पडल्या होत्या. प्रेमा किरण यांच्या निधनामुळे मनोरंजन विश्वावर शोककळा पसरली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात