मुंबई, 31 डिसेंबर : बॉलिवूड किंग शाहरुख खान आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण स्टारर चित्रपट ‘पठाण’ वादात आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातील भगव्या बिकीनीमुळे हा संपूर्ण वाद उफाळला असून या चित्रपटाचा तीव्र निषेध केला जात आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे. एकीकडे चित्रपट एकीकडे चित्रपटातील ‘बेशरम रंग’ गाण्यावरुन चित्रपटाचा निषेध होतोय तर दुसरीकडे सोशल मीडियावर या गाण्याचे व्हिडीओ बनवले जातायेत. अशातच बेशरम गाण्याची भुरळ एका मराठी अभिनेत्रीला लागली आहे. अभिनेत्रीने या गाण्यावर हॉट अंदाजातील व्हिडीओ शेअर केला आहे. बेशरम रंग गाण्याची भुरळ असणारी ही मराठी अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून प्रार्थना बेहेरे आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या गाण्यावर एक व्हिडीओ बनवला असून हा व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. प्रार्थनाने हा व्हिडीओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. प्रार्थनाचा हा हॉट अंदाज पाहून तिच्या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. नेहमीच ग्लॅमरस आणि पारंपारिक वेशभूषेत असणाऱ्या प्रार्थनाचा हा हॉट अंदाज पाहून चाहते थक्क झाले आहेत.
प्रार्थनाच्या व्हिडीओवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण प्रार्थनाचं कौतुक करत आहेत तर काहीजण तिला ट्रोल करत आहेत. मात्र हा व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत असून वातावरण गरम करत आहे. व्हिडीओतील प्रार्थनाच्या अदा पाहून चाहते घायाळ झालेले दिसत आहेत. या व्हिडीओमध्ये प्रार्थनाने गुलाबी रंगाचा शॉर्ट ड्रेस घातला आहे. जो स्लिव्हलेस बॉडिफिट आहे.
दरम्यान,अभिनेत्री प्रार्थना बेहेरे मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे. तिनं अनेक उत्तम चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. सध्या ती माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून नेहा कामत म्हणून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. या मालिकेमुळे तिला प्रेक्षकांचं खूप सारं प्रेम मिळत असतं. प्रार्थना सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. अनेक फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते.