जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO : मराठी मालिका विश्वातील 'या' अभिनेत्रीचं मुंबईच्या किनारी आहे स्वप्नातलं घर

VIDEO : मराठी मालिका विश्वातील 'या' अभिनेत्रीचं मुंबईच्या किनारी आहे स्वप्नातलं घर

VIDEO : मराठी मालिका विश्वातील 'या' अभिनेत्रीचं मुंबईच्या किनारी आहे स्वप्नातलं घर

सध्या मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या आलिशान घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 21 फेब्रुवारी- अनेक कलाकारांच्या घरांचे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. याशिवाय काही कलाकार देखील आपल्या चाहत्यांसोबत घराचे फोटो शेअर करत असते. सध्या मराठी मनोरंजन विश्वातील एका अभिनेत्रीच्या आलिशान घराचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. स्वप्नातलं घरं जसं असतं तसंच काहीसं या अभिनेत्रीचं घरं आहे. विशेष म्हणजे हे घर मुंबईच्या किनारी म्हणजे समुद्राच्या किनारी आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोण नसून प्रार्थना बेहरे आहे. प्रार्थना बेहेरेने नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिच्या घरच्या खिडकीतून मस्त आसा अथांग पसरलेला मुंबईचा समुद्र दिसत आहे. अगदी स्वप्नतलं घर असतं तसंच काहीसं चित्र या खिडकीतून दिसत आहे. मुंबईच्या समुद्रकिनारी आलिशान घर असावं असं बहुदा अनेकांचं स्वप्न असावं. पण प्रार्थनाने तिचं हे स्वप्न स्वतःच्या हिंमतीवर पूर्ण केलं आहे. वाचा- जावेद अख्तरांचं सर्जिकल स्ट्राईक;पाकच्या कार्यक्रमात म्हणाले, मुंबई हल्ल्याचे… यापूर्वी देखील प्रार्थना बेहरेने तिच्या घरातील काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. प्रार्थनानं शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये तिच्या घराचं आकर्षक इंटेरियर, मोठा फिश टँक तसेच घरातील विविध वस्तू लक्षवेधी दिसत आहेत.

जाहिरात

प्रार्थना बेहरे सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेतील सेटवरील धमालमस्तीचे अनेक व्हिडिओही ती नेहमी शेअर करत होती. चाहत्यांची तिला चांगली पसंती मिळत असते.

प्रार्थना बेहरे सध्या सुट्टयांचा आनंद घेताना दिसत आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमध्ये ती शेवटची दिसली होती. या मालिकेमधील तिच्या नेहा या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. या मालिकेमुळे तिला छोटया पडद्यावर एक वेगळी ओळख मिळाली. प्रार्थनाने अनेक मराठी सिनेमांमध्येही काम केलं आहे. मालिका, सिनेमा, इव्हेंट, फोटोशूट यातून वेळ मिळाला की प्रार्थनाचा रिल्स किंवा व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर करायला तिला खूप आवडतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात