जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'भारताच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील माणसे....?' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

'भारताच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील माणसे....?' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

'भारताच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील माणसे....?' प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत

1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता (prajakta mali ) माळीनं खास पोस्ट शेअर करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 1 मे- Maharashtra Din 2022: 1 मे 1960 रोजी अनेक राज्याच्या विभाजनापासून महाराष्ट्र राज्य स्थापन केले गेले. 1 मे रोजी महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याची निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी राज्यात सार्वजनिक सुट्टी असते. शिवाय हा दिवस कामगार दिवस म्हणूनही साजरा केला जातो. यानिमित्त अभिनेत्री प्राजक्ता (prajakta mali ) माळीनं खास पोस्ट शेअर करत सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. नेहमीच ती सोशल मीडियावर तिच्या कामाबद्दल अपडेड शेअर करत असते. याशिवाय तिचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असते. प्राजक्ता माळीनं तिचे काही साडीतील फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनानिमित्त आचार्य अत्रे यांचे एक कोट शेअर करत म्हटलं आहे की, ‘‘महाराष्ट्र” ह्या नावातच केवढं आव्हान, अभिमान, भावना भरलेली आहे. मोगलांची आणि इंग्रजांची सत्ता या वंशातून उखडून टाकण्याचा प्रयत्न प्रथमतः महाराष्ट्रात व्हावा, हे अद्भूत नव्हे काय? महाराष्ट्राच्या मातीत आणि मराठी माणसाच्या रक्तात असे काय विलक्षण रसायन भरल आहे, की भारताच्या स्वातंत्र्यावर घाला आल्यास पहिल्यांदा महाराष्ट्रातील माणसे खवळून उठतात? भारताचे पहिले स्वराज्यसंस्थापक “छत्रपती शिवराय” हे महाराष्ट्रात जन्माला आले. - आचार्य अत्रे यांच्या ओळी शेअर करत तिनं सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. वाचा- ‘सुख म्हणजे नक्की..‘मध्ये देवकी साकारणार ‘अग्गबाई सासूबाई’ फेम अभिनेत्री शिवाय प्राजक्ताने पुढं म्हटलं आहे की, मराठी तितूका मेळवावा !“महाराष्ट्र” धर्म वाढवावा…!हेच ब्रीदवाक्य आयूष्यभर उराशी बाळगून जगणार… ही प्रतिज्ञा !!! 🚩#सह्याद्रीचीलेक “महाराष्ट्र दिनाच्या आणि कामगार दिनाच्या” तुम्हा सगळ्यांना आभाळभर शुभेच्छा 🚩🚩

जाहिरात

🚩.#ऊरफाटेस्तोवरअभिमान #प्राण #प्रेम #आदर #महाराष्ट्रदेश 🎯#prajakttamali @…….तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सध्या सगळीकडं अमृता खानविलकरच्या ( amruta khanvilkar ) चंद्रमुखी (chandramukhi ) या सिनेमाची चर्चा आहे. प्राजक्ता माळीनं (prajakta mali ) या सिनेमात अमृतासोबत सवाल जवाब लावणी केली आहे. याशिवाय प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करताना दिसते. तिच्या निवेदनाच्या स्टाईलनं ती चाहत्यांचे मन जिंकताना दिसते. याशिवाय सेटवर देखील ती नेहमीच धमाल करताना दिसते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात