मुंबई, 26 एप्रिल- अभिनेता विराजस कुलकर्णी
(Virajas Kulkarni) आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे
(Shivani Rangole) मराठी मनोरंजन सृष्टीतील लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहेत. हे गोड जोडपं लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. तत्पूर्वी या दोघांनी झी मराठीवरील 'किचन कल्लाकार'
(Kitchen Kallakar) या शोमध्ये हजेरी लावली होती. याठिकाणी त्यांनी पदार्थ तर बनवलेत शिवाय उखाणासुद्धा घेतला. पाहूया या शोमध्ये नेमकं काय काय घडलं.
झी मराठीवर 'किचन कल्लाकार हा शो प्रसारित केला जातो. यामध्ये मनोरंजनसृष्टीपासून राजकीय नेत्यांपर्यंत सर्वच कलाक्षेत्रातील लोक सहभागी होतात. नुकतंच या शोमध्ये अभिनेत्री रेणुका शहाणे, पुष्कराज चिरपुटकर, विराजस कुलकर्णी आणि अभिनेत्री शिवानी रांगोळे यांनी सहभाग घेतला होता. यावेळी कलाकारांनी पदार्थ तर शिजवलेतच शिवाय गप्पांची खिचडीसुद्धा बनवली. कलाकारांनी एकत्र येत प्रचंड धम्माल केल्याचं दिसून येत आहे. या शोचे काही प्रोमो आणि फोटो सोशल मीडियावर पाहायाला मिळत आहेत.
दरम्यान अभिनेता विराजस कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर या शोचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. प्रोमोमध्ये त्यांच्यात उखाणा घेण्याची स्पर्धा लागलेली दिसून येत आहे. यावेळी अभिनेत्री रेणुका शहाणे आणि विराजस कुलकर्णी यांनी उखाणा घेतला होता. विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळेला या शोमध्ये श्रीखंड बनविण्यास सांगण्यात आलं होतं. त्याला अनुसरण उखाणा घेत विराजस म्हणतो, 'किचन कल्लाकारच्या सेटवर आम्हाला करायचाय श्रीखंड,शिवानी बरोबर आहेच आहे आता घेऊ का हे भांडं'. विराजसचा हा उखाणा ऐकून सेटवर एकच हास्यकल्लोळ होतो. त्यांनतर रेणुका शहाणे उखाणा घेत म्हणतात, 'राणाजींना अजिबात आवडत नाही कावळ्यांची काव-काव, किचन कल्लाकारवर येऊन मला हवाय हा डाव'. हा एपिसोड येत्या बुधवारी टीव्हीवर प्रसारित केला जाणार आहे.

बॉलिवूड असो, मराठी इंडस्ट्री असो किंवा छोटा पडदा सगळिकडेच सध्या लग्नाचं वारं वाहात आहे. मराठी मनोरंज सृष्टीतील लोकप्रिय कपल रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर यांनी नुकतंच लग्न केलं आहे. त्यांनतर हृता दुर्गुळेने साखरपुडा करत सर्वांनाच सुखद धक्का दिला होता. त्यानंतर विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे हे दोघे कधी लग्न करणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. चाहते त्यांच्या लग्नासाठी फारच उत्सुक आहेत. दरम्यान या दोघांच्या लग्नाची तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे. हे दोघे येत्या 7 मे रोजी लग्नगाठ बांधणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.