मुंबई, 2 एप्रिल- प्राजक्ता माळी सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असते. तिचे विविध फोटो, व्हिडिओ ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मध्यतंरी तिच्या काही सोशल मीडिया पोस्ट पाहाता प्राजक्ता राजकारणार प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा रंगली होती. विशेष करून तिनं जेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती तेव्हा ती मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. प्राजक्तानं मात्र या सगळ्या अफवा असल्याचं म्हणतं यावर पडदा टाकला होता. आता पुन्हा एकदा प्राजक्ता माळीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. विशेष म्हणजे प्राजक्ता या व्हिडिओमध्ये मनसेच्या गाण्यावर नादखुळा डान्स करताना दिसत आहे.
प्रश्न जिथे जनतेचा, मार्ग तिथे मनसेचा, नवनिर्माण घडवूया या मनसेच्या गाण्यांमधील ओळींवर प्राजक्ताने डान्स केलाय. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यावेळी प्राजक्तानं गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केल्याचा दिसत आहे. प्राजक्ताने मनसेच्या या गाण्यावर सोप्प्या तरीही खास स्टेप्सनी उत्तम डान्स केलाय. चाहत्यांनी देखील प्राजक्ताच्या या व्हिडिओवर कमेंट करत पसंती दर्शवली आहे.
वाचा-राणी मुखर्जीनं करीनाला सांगितली खास ट्रीक्स, पापाराझी मुलीचे फोटोच घेत नाहीत...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळावा काही दिवसांपूर्वी पार पडला. यामध्ये राज ठाकरे आणि मनसे यांच्यावर आधारित एक नवीन गाणं लाँच करण्यात आलं. यावेळी अवधूत गुप्ते आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे गाणं मनसेच्या मंचावर सादर केलं.धाडसी करारी राजसाहेब आपले पाठीशी असताना डरायचं न्हाय, वेड कार्यकर्त्यांचे मनात जपले जागे व्हा रे मागे फिरायचं नाय, प्रश्न जिथे जनतेचा मार्ग तिथे मनसेचा , नवनिर्माण घडवूया असे या गाण्याचे बोल आहेत.
View this post on Instagram
प्राजक्ता माळीनं काही दिवसापूर्वी तिचा प्राजक्तराज हा ज्वेलरी ब्रॅंड सुरू केला, विशेष म्हणजे याची ओपनिंग तिनं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते केली. त्यावेळी देखील प्राजक्ता मनसेत प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगलेली होती. आता प्राजक्ताचा मनसेचा गाण्यावरचा डान्स पाहून चाहत्यांना प्राजक्ताचं मनसे प्रेम लक्षात आलं आहे.
प्राजक्ता माळी सध्या महाराष्ट्राची हास्यजत्रा हा शो होस्ट करताना दिसत आहे. मालिकेतून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या प्राजक्तानं नाटक, सिनेमा व वेबसिरीज या तिन्ही माध्यमात काम केलं आहे. तिचा एक वेगळा चाहता वर्ग निर्माण झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.