HBD: 'आणि शाहरुखने केली होती मदत', शिल्पा शेट्टी झाली भावुक

नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’ च्या मंचावर शिल्पा शेट्टीने हजेरी लावली होती.

नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’ च्या मंचावर शिल्पा शेट्टीने हजेरी लावली होती.

  • Share this:
    मुंबई, 8 जून - अभिनेत्री(Actress)  शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty)  बॉलिवूडची फिटनेस क्वीन (Fitness Queen) समजली जाते. तिच्या योगाचे करोडो फॉलोअर्स आहेत. शिल्पा शेट्टी आज आपला 46 वा वाढदिवस(Birthday Today)  साजरा करत आहे. शिल्पा शेट्टीने काही दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, की त्यांच्या पहिल्या चित्रपटावेळी शाहरुख खानने तिला खूप मोठी मदत केली होती. वाचा काय आहे हा नेमका किस्सा. 8 जून 1976 मध्ये शिल्पा शेट्टीचा जन्म झाला होता. शिल्पा ही मूळची मेंगलोर, कर्नाटकची आहे. शिल्पा ही एक मॉडेल होती. नंतर तिने चित्रपटांमध्ये पदार्पण केल होतं. शिल्पाने 1993 मध्ये ‘बाजीगर’ या चित्रपटातून पदार्पण केल होतं. यावेळी शिल्पासाठी हे क्षेत्र अगदी नवं होतं. तिला अभिनयातील फारशी माहिती नव्हती.
    नुकताच ‘इंडियन आयडॉल 12’ च्या मंचावर शिल्पा शेट्टीने हजेरी लावली होती. त्यावेळी तिने बाजीगरचा एक किस्सा सर्वांशी शेयर केला होता. शिल्पाने म्हटलं होतं,’बाजीगर या चित्रपटाच्या ‘ये मेरे हमसफर’ या गाण्याचं शुटींग सुरु होतं. आणि मला त्यावेळी लीप सिंक करायचं होतं. मात्र मला त्यातली फारशी समज नव्हती आणि मी नवखी असल्याने खुपचं अस्वस्थ झालेली. त्यामुळे माझं लीप सिंक व्यवस्थित होतं नव्हत. (हे वाचा:HBD : अभिनय आणि फिटनेसशिवाय स्पोर्ट्समध्येही होती शिल्पा, पाहा Unseen Photos  ) त्यावेळी मला शाहरुखने खूप मोठं सहकार्य केल होतं. शाहरुख खूपच हेल्पफूल आहे. तो माझ्या जवळ आला. मला त्यानं शांत केल. आणि मला समजावून सांगितल, की लीप सिंक कस करायचं असत. त्याने मला त्या ट्रिक्स शिकवल्या. आणि म्हणूनच मी योग्य लीप सिंक देऊ शकले. असं म्हणत शिल्पाने शाहरुखचे आभार मानले होते. (हे वाचा:HBD: तब्बल 11 वर्षानंतर कमबॅक करत डिंपल यांनी दिले होते बोल्ड सीन  ) शिल्पा शेट्टीने बाजीगर, शूल, धडकन, इंडियन, लाईफ इन ए मेट्रो, दस अशा अनेक चित्रपटांत अभिनय करून आपला ठसा उमठवला आहे. तसेच सध्या शिल्पा शेट्टी एका डान्स शोमध्ये परीक्षक म्हणून काम करत आहे. सोबतच सर्वांना आपल्या योगा आणि फिटनेसद्वारे तंदुरुस्त ठेवण्याचं काम करत आहे. अशा या अभिनेत्रीला वाढदिवसाच्या खुप खूप शुभेच्छा
    Published by:Aiman Desai
    First published: