मुंबई, 5 मार्च- अभिनेत्री खुशबू तावडेने **(khushboo tawde )**काही दिवसापूर्वी तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो व व्हिडिओ शेअर करत चाहत्यांसोबत गु़ड न्यूड शेअर केली होती. त्यानंतर आता तिनं तिच्या बाळाचा पहिल्यांदाच चाहत्यांसोबत क्युट फोटो शेअर केला आहे. यापूर्वी तिनं बाळाचे काही पाठमोरे फोटो शेअर केले आहेत. मात्र आज खास निमित्त साधत तिनं बाळाचा क्युटवाला फोटो शेअर केला आहे. खुशबू तावडेने इन्स्टावर बाळासोबत फोटो शेअर करत म्हटलं आहे की, लग्नाला चार वर्षे पूर्ण आहे पालक म्हणून देखील आझ चार महिने पूर्ण झाले आहेत. संग्राम साळवी (sangram salvi) आणि खुशबू तावडेला 2 नोव्हेंबर 2021 रोजी पुत्ररत्न प्राप्ती झाली होती. त्यांनी मुलाचं नाव राघव ठेवलं आहे. मुलाच्या चार महिन्यानंतर त्यांनी हा क्युट फोटो शेअर केला आहे. या फोटोवर चाहत्यासह सेलेब्सकडून कमेंटचा वर्षाव सुरू आहे. अभिज्ञा भावे, गौरी नलावडे, रश्मी अनपट, सुयश टिळक यासह अन्य कलाकारांनी या फोटोवर कमेंट करत प्रेम व्यक्त केले आहे. वाचा- VIDEO : आदर्श-उत्कर्ष नंतर आता शिंदेंच्या लेकीची संगीत क्षेत्रात एंट्री देवयानी या मालिकेतून एकत्रित काम करत असताना संग्राम आणि खुशबूची ओळख झाली. या ओळखीचे पुढे लग्नात रूपांतर झाले. हे दोघेही 2018 साली मोठ्या थाटात विवाहबंधनात अडकले. ‘साईड वॉक कॅफे’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला आहे.
खुशबू तावडेने अभिनयासोबतच हॉटेल मॅनेजमेंटचे प्रशिक्षण घेतले आहे. एक मोहोर अबोल, देवयानी, पारिजात, धर्मकन्या, मेरे साईं, तेरे बिन, आम्ही दोघी, सावन अशा हिंदी मराठी मालिकेतून खुशबू महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. तर संग्राम साळवी देवयानी, कुलस्वामिनी, सरस्वती, कन्यादान मालिकेत काम केले आहे.