जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'एक चॅन्स तर द्या..', मुलाला काम मिळेना म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेत्री चिंतेत

'एक चॅन्स तर द्या..', मुलाला काम मिळेना म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेत्री चिंतेत

'एक चॅन्स तर द्या..', मुलाला काम मिळेना म्हणून लोकप्रिय मराठी अभिनेत्री चिंतेत

किशोरी शहाणे या त्यांचा कामाबद्दल समाधानी आहेत मात्र त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. त्यांचे मते मोठे कलाकार नवीन लोकांना संधी देत नाहीत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 6 मार्च- किशोरी शहाणे (kishori shahane ) या मराठी, हिंदी सिनेसृष्टी, नाट्यसृष्टी आणि छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. सध्या त्यांची गुम है किसी के प्यार ही हिंदी मालिका लोकप्रियतेच्या शिकरावर आहे. किशोरी शहाणे या त्यांचा कामाबद्दल समाधानी आहेत मात्र त्यांनी एक खंत व्यक्त केली आहे. त्यांचे मते मोठे कलाकार नवीन लोकांना संधी देत नाहीत. रोनित रॉय, बाबा सहगल आणि अली असगर यांचे नाव घेत त्यांनी सांगितलं री, मागच्या काळात माझा नवरा दिग्दर्शक दीपक बलराजने अनेक लोकांना ब्रेक दिला. यामध्ये अभिनेत्यांसह काही गायकांचा देखील समावेश आहे. आम्ही लोकांना संधी दिली होती. मात्र आता बॉलिवूडमध्ये करिअर करणं म्हणजे अवघड झालं आहे. मुलाला काम मिळेना म्हणून किशोरी शाहणे चिंतेत आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, किशोरी शहाणे यांना त्यांचा मुलगा बॉबी विजला सिनेमात काम मिळेना याची चिंता लागली आहे. 25 वर्षाचा बॉबीला सिनेमात काम करायचे आहे. किशोरी यांच्या मते, बॉबीला काम मिळावे यासाठी तो योग्य आहे. माझा मुलगा लहान असल्यापासून थिएटर करत आहे. मला वाटतं की, त्याचं नाव व्हायला हवं त्याला ब्रेक मिळायला हवा. दशकभर आम्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे मग तर आमच्या मुलाला चांगला प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे. वाचा- दिव्या अग्रवालचं वरुण सूदसोबत ब्रेकअप, लग्नाच्या चर्चात 4 वर्षांच नातं तुटलं तसेच किशोरी शहाणे पुढे म्हणाल्या की, मला त्याच्या टॅलेंटवर विश्वास आहे. तो ऑलराऊंडर आहे. ज्याच्याशी तो बोलतो त्याला तो आवडतो. लोक त्याच्यासोबत बोलतात मात्र काही तर होत आणि बोलणी थांबतात. काम टॅलेंटवर द्या मात्र एक चॅन्स तर द्या.किशोरी यांची इंडस्ट्रीमध्ये चांगली ओळख  आहे.  तसं असताना देखील त्या मुलाची भेट एकाद्या मोठ्या स्टारसोबत घडवून आणू शकलेल्या नाहीत. मी आतापर्यंत बॉबीला कोणाकडं घेऊन गेलेले नाही मात्र आता लवकरच तसं करणार आहे. माझ्या कोणवर तक्रार नाही मात्र मी थोडी नाराज आहे.

जाहिरात

किशोरी यांनी आतापर्यंत ७० पेक्षा अधिक मराठी, हिंदी चित्रपटांमधून तसेच टीव्ही मालिकांमध्ये भूमिका केल्या आहेत. बिग बॉस मराठी या रिअॅलटी कार्यक्रमातही त्या सहभागी झाल्या होत्या. किशोरी शहाणे यांचे लग्न चित्रपट निर्माते दीपक विज यांच्याशी झाले असून, या दांपत्याला एक मुलगा आहे. दीपक विज यांनी ‘ऐका दाजीबा’ या मराठी चित्रपटाचं दिग्दर्शनही केले आहे. किशोरी शहाणे यांनी परदेशातही शास्त्रीय नृत्याचे शो केले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात