जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'वहिनीसाहेबां'चं छोट्या पडद्यावर कमबॅक, अभिनेत्रीचे PHOTOS झाले व्हायरल

'वहिनीसाहेबां'चं छोट्या पडद्यावर कमबॅक, अभिनेत्रीचे PHOTOS झाले व्हायरल

'वहिनीसाहेबां'चं छोट्या पडद्यावर कमबॅक, अभिनेत्रीचे PHOTOS झाले व्हायरल

‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashree Kadgaonkar Latest Photos) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन (dhanashri kadgaonkar comeback) करत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 5 ऑक्टोबर: ‘तुझ्यात जीव रंगला’ (Tujhyat Jeev Rangala) या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली वहिनीसाहेब म्हणजेच अभिनेत्री धनश्री काडगांवकर (Dhanashree Kadgaonkar Latest Photos) पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन (dhanashri kadgaonkar comeback) करत आहे. आता ती एका वेगळ्याच भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. धनश्री मोठ्या गॅपनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येतेय त्यामुळे तिची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे आणि तिच्या चाहत्यांना देखील तिला पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत बघण्याची तितकीच उत्सुकता आहे. ती एका पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ‘घेतला वसा टाकू नको’ मालिकेत नवरात्री विशेष भागात दिसणार दुर्गामातेच्या भूमिकेत धनश्री दिसणार आहे. Imagedhanashree kadgaonkar या भूमिकेबद्दल धनश्री काय म्हणाली ‘माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. मध्ये मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल कि नाही, मी काही विसरली तर नाही ना अशा अनेक शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि या मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. घेतला वसा टाकू नको असं मी माझ्या मनाशी पक्क करून ही भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणाऱ्या दुर्गा मातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.’ असे मत धनश्रीने या भूमिकेबद्दल व्यक्त केले आहे. तिची ‘वहिनीसाहेब’ ही भूमिका चांगलीच गाजली. मालिका विश्वात सक्रीय असतानाच 2013 मध्ये धनश्रीने दुर्वेशसोबत लग्नगाठ बांधली. आता खऱ्या आयुष्यातही एक नवी भूमिका सशक्तपणे सांभाळण्यास धनश्री तयार झाली आहे. ‘घेतला वसा टाकू नको’ ही मालिका 7 मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘घेतला वसा टाकू नको’ ही मालिका पौराणिक कथांवर आधारित आहे, आपण सर्वांनीच आपल्या लहानपणी आजी कडून किंवा आई कडून ‘एक आटपाट नगर होतं तिकडे एक साधुवाणी राहत होता’ या चातुर्मासाच्या गोष्टी ऐकल्या असतील, ह्याच चातुर्मासातल्या कथा आणि व्रतवैकल्य प्रेक्षकांना मालिकारूपात पाहिला मिळणार आहेत. या निमित्ताने झी मराठीवर एक वेगळा प्रयोग होत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात