जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / VIDEO: उत्कृष्ट अभिनेत्री झाली शेफ नेमळेकर...तयार केलेला पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

VIDEO: उत्कृष्ट अभिनेत्री झाली शेफ नेमळेकर...तयार केलेला पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

VIDEO: उत्कृष्ट अभिनेत्री झाली शेफ नेमळेकर...तयार केलेला पदार्थ पाहून तोंडाला सुटेल पाणी

शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर ( apurva nemlekar )सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. आता अपूर्वाने नुकताच एक किचनमधील व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 16 मार्च-    शेवंता फेम अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर **( apurva nemlekar )**सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. तिच्या हटके फोटोशुटमुळे नेहमी ती चाहत्यांची लक्षवेधून घेत असते. रात्रीस खेळ चाले मालिकेनंतर अपूर्वा ‘स्वराज्य सौदामिनी ताराराणी’ या मालिकेत दिसली होती. आता अपूर्वाने नुकताच एक व्हिडिओ **( apurva nemlekar latest video )**शेअर केला आहे. या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. अपूर्वाने इन्स्टावर तिच्या किचनमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये अपूर्वा चिकन बिर्याणी करताना दिसत आहे. तिनं मस्त बिर्याणीचा व्हिडिओ शेअर केला आहे. बिर्याणी पाहून मात्र चाहत्यांच्या तोंडाला पाणी सुटले आहे. अपूर्वाने हा व्हिडिओ शेअर करत म्हटलं आहे की, दिल का रस्ता पेटसे जाता आहे..बिर्याणी लव्हर…तिचा हा व्हिडिओ करत असताना तिची मैत्रीण म्हणताना दिसत आहे की, आपली उत्कृष्ट  अभिनेत्री या शेफ नेमळेकर झाल्या आहेत..यावर अपूर्वा देखील हासताना दिसत आहे. तिच्या या व्हिडिओवर कमेंटचा वर्षाव होत आहे. वाचा- ‘चंद्रमुखी’मध्ये हा अभिनेता आहे ‘ध्येय धुरंधर राजकारणी’; पण कोण आहे चंद्रा महाराष्ट्राची हास्यजत्रा ( maharashtrachi hasya jatra ) या कार्यक्रमाने प्रेक्षकांच्या मनात एक हक्काच स्थान निर्माण केलं आहे. कार्यक्रमाचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. आता या मंचावर अभिनेत्री रात्रीस खेळ चाले फेम शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरची देखील (Apurva Nemlekar) एंट्री होणार आहे. याचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. चाहते देखील अपूर्वाला नवीन रूपात **(maharashtrachi hasya jatra latest epidode)**पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

जाहिरात

रात्रीस खेळ चाले मालिकेच्या दुसऱ्या हंगामात अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने साकारलेले शेवंता हे पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. मालिकेच्या तिसऱ्या हंगामातही ही भूमिका अपूर्वा साकारत होती. मात्र अपूर्वाने अचानक मालिका सोडल्याने प्रेक्षकांना आणि शेवंताच्या चाहत्यांना धक्का बसला होता. रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर अपूर्वाचं नाव चांगलेच चर्चेत आलं होतं. तिनं मालिका सोडण्यामागचं खऱ कारण देखील सोशल मीडियावर सांगितलं होतं. सेटवर काही कलाकारांकडून तिला चुकीच्या पद्धतीनं वागणूक दिली जात असल्याचे तिनं म्हटलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात