मुंबई, 26 फेब्रुवारी- येऊ कशी तशी मी नांदायला मालिकेतून स्वीटूच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री अन्विता फलटणकर सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. सध्या अन्विता एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. ध्वनी प्रदूषणाला कंटाळून तिनं पोलिसात धाव घेतल्याचे समोर आलं आहे. ई टाईम्सनं याबाबत वृत्त देखील दिलं आहे. अन्विता फलटणकर ठाण्यात राहते. ती राहत असलेल्या भागात होणाऱ्या प्रचंड ध्वनी प्रदुषणाबाबत तिने थेट आक्रमक पवित्रा घेतला आहे. ती ठाण्यात जिथे राहते तिथून जवळच्या एका बिल्डिंगमधून सतत मोठ मोठ्याने गाणी लावली जातात. यामुळे प्रचंड ध्वनी प्रदुषण होते. यासंदर्भात अन्विताने दोन वेळा जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी फोन केला होता मात्र तिला कोणताही रिस्पॉन्स मिळाला नाही. पोलिसांनी दखल न घेतल्याबद्दल तिनं खंत देखील व्यक्त केली होती. वाचा- बायकोला पुरस्कार मिळताच सिद्धार्थने स्टेजवर धावत जात केलं असं काही; पाहा व्हिडीओ अन्विता ठाण्यातील ज्या भागात राहते तिथे वयोवृद्ध नागरिक राहतात. तसेच त्या भागात हॉस्पिटल देखील आहेत. ज्या बिल्डिंगमधून हा कर्णकर्कश आवाज येतो त्यामुळे सर्वांना ध्वनीप्रदुषणाचा त्रास सहन करावा लागतो.. त्यामुळे अन्विताने याबाबत काही मार्गदर्शक तत्व असतील तर सांगावीत असे सांगितले. अन्विताने एका वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे.
अन्विताने याप्रकरणाची डिसेंबर 2022 मध्ये देखील तक्रार केल्याचे सांगितले. तसेच याबाबत जवळच्या पोलीस ठाण्यातूनही कोणती मदत झाली नसल्याचे सांगितले. त्यांनी याप्रकरणाची आजपर्यंत दखल घेतली नसल्याचे तिनं सांगितलं.
अन्विताला डान्सचं प्रचंड वेड आहे. अनेकादा सोशल मीडियावर तिचे भन्नाट डान्स व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या डान्स व्हिडिओला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळत असतो. आजही अन्वितानं साकारलेली स्वीटू प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहेत. आजही ओम आणि स्वीटूवर प्रेक्षक भरभरून प्रेम करताना दिसतात. या क्यूट जोडीला प्रेक्षक विसरू शकलेले नाहीत. या जोडीची केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत होती. आजही प्रेक्षक त्यांना मिस करतात.