हिंदीत एक डायलॉग खूप लोकप्रिय आहे, ‘मुछे हो तो नथुलाल जैसी हो. तसाच काहीसा ट्रेंड सध्या मराठी कलाकारांमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. इतक्यात अनेक कलाकार हे त्यांच्या moustache लुकमुळे खूप चर्चेत येत आहेत. पाहूया अशाच काही लोकप्रिय अभिनेत्यांचे हे मिशीवाले लुक.
अमेय वाघ या अभिनेत्याचा वाघाचा swag तर भल्याभल्यांना लाजवणारा आहे. सध्या हा अभिनेता मिशी मध्ये भलताच क्युट दिसत आहे.
अमेयला कायम अनेकांनी क्लीन शेव्ह लुकमध्ये पाहिलं असल्याने हा वेगळा लुक त्याचा शोभून दिसत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे.
मराठीत सु.ल म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता सुव्रत जोशी सध्या त्याचा मिशीमधला लुक तसाच राखून ठेवताना दिसत आहे.
छोट्या पडद्यावर तडफदार पोलिसांची भूमिका साकारणारा अभिनेता हरीश दुधाडे त्याच्या पिळदार मिशीचा लुक कायम ठेवताना दिसत आहे.
‘स्वाभिमान- शोध अस्तित्त्वाचा’ मालिकेत झळकणारा अभिनेता अक्षद कोठारी सुद्धा त्याच्या किलर लूकसाठी ओळखला जातो.
अभिनेता प्रियदर्शन जाधव सध्या नव्या नाटकातून प्रेक्षकांसमोर आला आहे. त्याने मागे एकदा या अफलातून मिशीवाल्या लुकमध्ये फोटोशूट सुद्धा केलं होतं.