मुंबई, 02 डिसेंबर: मराठमोळा अभिनेता स्वप्नील जोशी (swapnil joshi )आणि उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांचा संयुक्त प्रकल्प असलेले ‘1 ओटीटी’ (ओव्हर द टॉप) हे व्यासपीठ सर्व भारतीय भाषांमधील कार्यक्रमांसाठी तयार झाले आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते ‘1 ओटीटी’ या नवीन ओटीटीच्या लोगोचे अनावरण 1 डिसेंबर 2021 रोजी राज भवन येथे करण्यात आले. स्वप्नील जोशीने यासंदर्भात व्हिडिओ शेअर करत माहिती दिली आहे. यावेळी राज्यपाल म्हणाले, स्वप्नील जोशी, नरेंद्र फिरोदिया आणि त्यांच्या सर्व चमूचे मी मनापासून अभिनंदन करतो. भारतीय भाषांमधील मनोरंजनासाठी त्यांनी हे अनोखे असे व्यासपीठ दाखल केले आहे. त्यांच्या या प्रयत्नात त्यांना सर्वतोपरी यश मिळो, अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. ‘1 ओटीटी’ हा नवीन प्रोजेक्ट ‘अपने भारत का अपना मोबाईल टीव्ही’ असणार आहे. हिंदीबरोबरच मराठी, बंगाली आणि इतर भारतीय भाषांमधील कार्यक्रम सादर करत हे व्यासपीठ खऱ्या अर्थाने ‘अपने भारत का अपना मोबाइल टीव्ही’ ठरणार आहे. वाचा : ‘पॅन्ट घालायला विसरली का..!’ रसिका सुनील हनिमून स्पेशल फोटोवरून होतेय ट्रोल, पाहा Photo स्वप्नील जोशीच्या मनात ओटीटी व्यासपीठ सुरु करण्याचे होते. त्याचप्रमाणे नरेंद्र फिरोदिया हेसुद्धा भारतीय भाषांसाठी एक ओटीटी असावा अशी योजना अखात होते. या दोघांना एकमेकांच्या या योजनांबद्दल कळले तेव्हा त्या दोघांनी एकत्र येत ओटीटी सुरू करण्याचे ठरवले.
या नवीन प्रोजेक्टविषयी स्वप्निल जोशी म्हणाला की, गेली दोन वर्षे मी ओटीटी सुरु करण्याचे ठरवत होतो. एक कलाकार म्हणून काहीतरी वेगळे करणे आणि लोकांना काहीतरी वेगळे देणे, हा त्यामागील हेतू होता. दरम्यानच्या काळात मी जेव्हा फिरोदिया यांच्याशी बोललो तेव्हा तेसुद्धा भारतीय भाषांसाठी असेच एक व्यासपीठ सुरु करण्याचे विचार करत असल्याचे सांगितले. मग चर्चेनंतर आम्ही दोघांनी एकत्र येवून ही योजना तयार केल्याचे स्वप्निल जोशीने सांगितले.

)







