Home /News /entertainment /

स्वप्नील जोशीने शेअर केला घरातला Cute Video: मुलं रोज देतात हे Surprise

स्वप्नील जोशीने शेअर केला घरातला Cute Video: मुलं रोज देतात हे Surprise

स्वप्नील जोशीनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. स्वप्नीलने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, शूटिंग करून कितीही कंटाळून घरी आल्यावर जर असं स्वागत होणार असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यात…

    मुंबई, 12 मार्च- अभिनेता स्वप्नील जोशी (  swapnil joshi )नेहमी सोशल मीडियावर सक्रीय असतो. स्वप्नील जोशी च्याचे विविध व्हिडिओ तसेच फोटो चाहत्यासोबत शेअर करत असतो. या सगळ्यात खास लक्षवेधून घेतात ती स्वप्नील जोशीची दोन मुलं मायरा आणि राघव. मायरा आणि राघवचा असाच एक व्हिडिओ स्वप्नीलने शेअर केला आहे. एकादा बाप कामावरून दमून आल्यावर त्याची मुलं जेव्हा त्याला असं काही देतात तेव्हा त्याचा आनंद देखील गगनात न मावण्यासारखा असतो. स्वप्नीलचा मुलांसोबतच हा व्हिडिओ पाहून देखील तुमच्या हेच लक्षात येईल हे नक्की आहे. स्वप्नील जोशीनं इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. स्वप्नीलने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटलं आहे की, शूटिंग करून कितीही कंटाळून घरी आल्यावर जर असं स्वागत होणार असेल तर अजून काय पाहिजे आयुष्यात…स्वप्नीलने त्याच्या व्हिडिओची सुरूवातच अशी केली आहे की, गेल्या काही दिवसांपासून मी घरी आल्यावर एक प्रकार घडत आहे आणि आज तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. माहित नाही आज तो प्रकार घडेल का, पण कदाचित घडेल. आणि दार उघडताच मायरा आणि राघव या त्याच्या मुलांकडून ती खास चिठ्ठी स्वप्नीलला मिळाल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. वाचा-'आई कुठे काय करते'चा शेवट, आप्पा लावून देणार अरुंधती- आशुतोषचं लग्न? या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, स्वप्नील रोज रात्री जेव्हा शूटिंग आटपून घरी येतो आणि दारावरची बेल वाजवतो तेव्हा त्याची मुलगी मायरा आणि मुलगा राघव दार उघडतात. स्वप्नील आत आला की त्याच्या हातात मुलं एक छोटी चिठ्ठी देतात. स्वप्नील जेव्हा ही चिठ्ठी उघडून पाहतो तर त्यात जे लिहिलेलं असतं ते वाचून त्याला जे वाटते तेच त्याने या व्हिडिओमधून शेअर केले आहे. स्वप्नीलची मुलगी मायरा त्याच्या हातात छोटी चिठ्ठी देते. त्यामध्ये असं लिहिलेलं असतं, वेलकम बॅक होम डॅडू… आय लव्ह यू..मुलाचं हे प्रेम पाहून चाहत्यांकडू या व्हिडिओवर कमेंटता वर्षाव होत आहे. स्वप्नील जोशीचे मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी, मितवा, प्यार वाली लव्हस्टोरी हे सिनेमे खूपच गाजले. यासोबत समांतर या वेबसिरीजमध्ये त्याने केलेली गंभीर भूमिकेचेही प्रेक्षकांकडून कौतुक झालं. सध्या तो चला हवा येऊ द्या या शोमध्ये दिसत आहे. लवकरच स्वप्नील तू तेव्हा तशी या मालिकेत दिसणार आहे. ज्यामध्ये तो अभिनेत्री शिल्पा तुळसकरसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee marathi serial

    पुढील बातम्या