Home /News /entertainment /

'दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार, आधी मराठी शाळा वाचवा'; ठाकरे सरकारच्या निर्णयवार अभिनेत्याची 'कडक' पोस्ट

'दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार, आधी मराठी शाळा वाचवा'; ठाकरे सरकारच्या निर्णयवार अभिनेत्याची 'कडक' पोस्ट

'फलक मराठीत लिहून “मराठी अस्मिता” जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय.' ठाकरे सरकारच्या मराठी फलकांबाबतच्या निर्णयावर अभिनेत्याने तळमळीने लिहिलंय.

    मुंबई, 13 जानेवारी- मराठी व हिंदी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता सुमीत राघवन (Sumit Raghavan on Marathi) सोशल मीडियावर विविध विषयावर मत मांडत असतो. नुकताच सुमित राघवन यांने एक व्हिडिओ पोस्ट करत मराठीच्या मुद्दयाला हात घातला आहे. महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठी भाषेमध्ये (Maharashtra government orders Marathi Boards on shops) असावेत, असा निर्णय मंत्रिमंडळाने बुधवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. अन्य भाषांमध्ये नामफलक लावता येतील, पण अक्षरांचा आकार हा मराठीपेक्षा मोठा असता कामा नये, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या  (Uddhav Thackeray government on Marathi) या निर्णयावर सुमित राघवन याने प्रश्न उपस्थित केला आहे. त्याने एकमागून एक ट्वीट करत काही सवाल उपस्थित केले आहेत. सुमीत राघवन याने ट्वीटरवर मंत्री सुभाष देसाई (Subhash Desai) यांचा दुकानांवर मराठी पाट्यांच्या निर्णयासंदर्भातील एक व्हिडिओ रिट्वीट केला आहे. त्याने हा व्हिडिओ पोस्ट करत म्हटले आहे की, याने खरंच काही मदत होणार आहे का? तर नाही. मराठी वाचवायची असेल तर मराठी शाळा वाचवा, मराठी पालकांना आपल्या मुलाला मराठी शाळेत (Marathi schools) दाखल करण्यासाठी प्रोत्साहित करा. सर्व मराठी शाळा इंग्रजी माध्यमात बदलत आहेत. सरकारचा हा निर्णय बॉम्बेचं मुंबई करण्यासारखा आहे, कृपा करून मोठा विचार करा. दुकानांची नावं मराठीत लिहून काय होणार?...असं त्याने म्हटलं आहे. दुसऱ्या ट्वीटमध्ये सुमित म्हणतो की, “मोलकरीण आणि ड्रायव्हरच्या मुलांबरोबर शिकतील का आमची मुलं?”असं काही पालक म्हणताना ऐकलंय आम्ही. लै प्रेम आपल्याला इंग्लिशचे. चांगलं आहे, असावं. पण एवढं लक्षात घ्या बोर्ड, फलक मराठीत लिहून “मराठी अस्मिता” जपली जात नाही. आतून बदल घडला पाहिजे. जे दुरापास्त वाटतंय.” वाचा-रोज नव्या नावाची भर, अरोह वेलणकरसह या मराठी कलाकारांना झाला कोरोना सुमित राघवन आणखी एक ट्वीच केले आहे. त्यामध्ये तो म्हणतो की, मी म्हणतो हरकत नाही. इंग्लिश बद्दल तिरस्कार नाहीये. पण जी राज्याची भाषा आहे ती नको का जपायला. दुकानांची नावं मराठीत लिहिणं हे सगळं वरवरचं झालं. जो "मराठी" आहे त्याला किंमत आहे का भाषेची? मग अमराठी व्यापाऱ्यांच्या माथी का मारा? ही बळजबरी झाली नाही का? अवस्था बघा मराठी शाळांची? वाचा-Bigg Boss Marathi 3 फेम सोनाली पाटीलच्या घरी मीनल शाहच जंगी स्वागत, VIDEO यापूर्वी सुमतची पत्नी चिन्मयीने देखील मराठी मद्दयाला घातला होता हात यापूर्वी सुमतची पत्नी चिन्मयीने देखील फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला होता. तिनं म्हटलं होते की, ‘हे रील पाहून तुम्हाला कदाचित ,कदाचित कशाला हमखास हसू येणार आहे...पण हळू हळू असंच होणार आहे. मराठी आकडे, मराठी स्वर , व्यंजनं, मुळाक्षरं सारीच विस्मरणात जाणार आहेत. वेष कसा असावा, खावं प्यावं काय, कुणाचे पुतळे, कुणाचे जयजयकार, खरा इतिहास, खोटा इतिहास, चुकीचा इतिहास ह्यावर संस्कृतीचा ठेका घेऊन वादंग माजवणारे लोक मराठीबद्दल काहीच भूमिका का घेत नाहीत? इतका उबग आलाय आता. आता सरकारने एक आदेश काढून एका फटक्यात बंदच करुन टाकाव्यात मराठी शाळा...’ एक का मराठी वाहिनीने आपल्या एका रिअ‍ॅलिटी शोचा प्रोमो शेअर केला होता. या प्रोमोत स्पर्धक आणि मराठी मुलांना मराठी आकडे समजत नाहीत, असा हा व्हिडिओ होता. याच व्हिडिओवरून तिनं मराठीच्या मुद्दयाला हात घातला होता.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Entertainment, Marathi entertainment

    पुढील बातम्या