सुबोध भावेची चाहत्यांना गुढीपाडव्याची संगीतमय भेट; शेअर केला VIDEO

सुबोध भावेची चाहत्यांना गुढीपाडव्याची संगीतमय भेट; शेअर केला VIDEO

साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याचं (Gudipadawa) औचित्य साधत अभिनेता सुबोध भावेने (subodh bhave) मोठी घोषणा केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 एप्रिल : आज गुढीपाडवा (gudipadawa) म्हणजेच नवीन वर्षाची सुरुवात. आजचा दिवस मराठी माणसांसाठी खूपच खास असतो. आजच्या दिवशी अनेक नवीन गोष्टींची सुरुवात केली जाते कारण हा साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक मुहूर्त समजला जातो. याचंच औचित्य साधत मराठी अभिनेता सुबोध भावेनं (subodh bhave) आपल्या नव्या संगीतमय चित्रपटाची (musical film announcement) घोषणा केली आहे. सुबोधने स्वतः पोस्ट (instagram) करत याबद्दल माहिती दिली आहे. त्यामुळे सोशल मीडियावरून सुबोधवर शुभेच्छांचा वर्षाव होतं आहे.

सुबोध भावे हा मराठीतील एक अत्यंत निपुण असा कलाकार समजला जातो. सुबोधने विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. फक्त अभिनयच नव्हे तर एक दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून सुद्धा सुबोधने आपला ठसा उमटवला आहे.  सुबोधने मालिका, चित्रपट, नाटक या तिन्ही क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. सुबोधने साकारलेली ‘बालगंधर्व’ ची भूमिका तर प्रेक्षकांच्या मनावर कोरली गेली आहे.

View this post on Instagram

A post shared by Subodh Bhave (@subodhbhave)

‘कट्यार काळजात घुसली’ हे नाटक अतिशय प्रसिद्ध असं नाटक आहे. हे संगीतमय नाटक पुरुषोत्तम दारवेकर यांनी लिहिलं आहे. या नाटकावर आधारित ‘कट्यार काळजात घुसली’ हा चित्रपट सुबोध भावेनं दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट 2015 मध्ये प्रदर्शित झाला होता. यामध्ये संगीतमय प्रवास रेखाटण्यात आला होता. त्याला प्रचंड यश मिळालं होतं. हा चित्रपट प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला होता. यामध्ये सचिन पिळगांवकर, शंकर महादेवन, सुबोध भावे, पुष्कर श्रोत्री, मृण्मयी देशपांडे, अमृता खानविलकर साक्षी तंवर यांनी भूमिका साकारल्या होत्या.

हे वाचा - दिवाळी पाडव्याला दिसणार मराठी ‘चंद्रमुखी’; गुढीपाडव्याला प्रसाद ओकने दाखवली झलक

या चित्रपटाच्या उत्तुंग यशानंतर आत्ता सुबोध भावे पुन्हा एकदा संगीतमय चित्रपट घेऊन येत आहेत. आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर सुबोधनं आपल्या इन्स्टाग्रामवरून ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. यावेळी सुबोधनं म्हटलं आहे. आज नवीन वर्षाची सुरुवात, आनंदाची गुढी उभारूया! नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना संगीतमय शुभेच्छा! माणसाला माणसाशी जोडणारं, त्याला परमोच्च आनंद देणारं दान म्हणजे संगीत! तुम्हा सर्वांना मनसोक्त आनंद द्यायला पुन्हा एकदा एक संगीतमय चित्रपट घेऊन येत आहोत.

हे वाचा - सोनाली कुलकर्णी ते अमृता खानविलकर; सेलिब्रिटींनी कसा साजरा केला गुढीपाडवा पाहा )

हा चित्रपट प्रसिद्ध मराठी नाटक ‘संगीत मानापमान’ यावर आधारित ‘मानापमान’ हा चित्रपट सुबोध घेऊन येतं आहे. हा चित्रपट 2022 मध्ये आपल्या भेटीला येणार आहे. सुबोधनं मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षाची संगीतमय सुरुवात करून दिली आहे. सुबोधची पत्नी मंजिरीनं सुद्धा ही पोस्ट करत माहिती दिली आहे. तर अभिनेत्री सायली संजीवनेसुद्धा ही पोस्ट करत शुभेच्छा दिल्या आहेत. सुबोधनं ही घोषणा करताच स्वप्नील जोशी ते सिद्धार्थ जाधव या सर्व अभिनेत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Aiman Desai
First published: April 13, 2021, 10:57 PM IST

ताज्या बातम्या