जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / सिद्धार्थ जाधवची आई-वडिलांसाठी खास पोस्ट, फोटो पोस्ट करत म्हणाला...

सिद्धार्थ जाधवची आई-वडिलांसाठी खास पोस्ट, फोटो पोस्ट करत म्हणाला...

सिद्धार्थ जाधवची आई-वडिलांसाठी खास पोस्ट, फोटो पोस्ट करत म्हणाला...

अभिनेता सिद्धार्थ जाधव याने त्याच्या आई वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, सोबत एक छान असा फोटो देखील शेअर केला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 26 मे- मराठी मनोरंजन सृष्टीतला स्टाइल आयकॉन अशी ओळख असलेल्या सिद्धार्थ जाधव ( Siddharth jadhav ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. सिद्धार्थ नेहमीच त्याच्या हटके ड्रेसिंग स्टाईलनं सर्वांचे लक्षवेधून घेत असते. सोशल मीडियाच्याम माध्यमातून तो नेहमीच चाहत्यांशी कनेक्ट राहण्याचा प्रयत्न करतो. तसेच त्याच्या आगामी प्रोजेक्टसंबंधी माहिती देखील तो सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतो. आज त्यानं त्याच्या आई वडिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे, सोबत एक छान असा फोटो देखील शेअर केला आहे. सिद्धार्थ जाधवच्या आई वडिलांसाठी आजचा दिवस खूपच खास आहे. आज त्यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. हेच खास निमित्त साधत सिद्धार्थनं त्याच्या आई वडिलांसोबतचा एक फोटो इन्स्टाला शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने म्हटलं आहे की, रामचंद्र ❤️ मंदाकिनी.. आई बाबा… लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा… happy anniversary…#anniversary #together #आई #बाबा #happy #lucky #celebration..त्याच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाचा- हेमांगीला विदाआऊट मेकअप पाहून नेटकऱ्यांनी केली अजब मागणी, अभिनेत्री म्हणाली… अभिनेता सिद्धार्थ जाधवचा जन्म 23 ऑक्टोबर 1981 साली झाला. कोंकणातील रत्नागिरी हे त्याचे जन्मगाव आहे, तर वास्तव्य मुंबईतच आहे. मुंबईतच तो लहानाचा मोठा झाला. त्याच्या वडिलांचे नाव रामचंद्र जाधव तर आईचे नाव मंदाकिनी जाधव आहे. तर बहिणीचे नाव पंकजाक्षी जाधव असं आहे. सिद्धार्थने 10 मे 2007 मध्ये तृप्ती अक्कलवारशी लग्न केले. त्यांना स्वरा आणि इरा या दोन मुली आहेत.

जाहिरात

गोलमाल, गोलमाल रिटर्न्स, सिम्बा अशा सुपरहिट बॉलिवूड सिनेमांमध्ये त्याने अभिनय केला आहे पण त्यांचे पहिले प्रेम म्हणजे मराठी चित्रपट, टीव्ही आणि स्टेज असल्याचे तो ठामपणे सांगतो.मिथुन चक्रवर्ती मुख्य भूमिकेत असणार्‍या अमी सुभाष बोलची नावाच्या बंगाली चित्रपटातही जाधव याने अभिनय केला आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनय कारकीर्दीची सुरुवात अगदी लहान वयातच केली होती आणि 1996 मध्ये रविकिरण बालनाट्य स्पर्धा येथे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळवला होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात