जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ''मला नाही येत. मला नाही जमत'', सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

''मला नाही येत. मला नाही जमत'', सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

''मला नाही येत. मला नाही जमत'', सिद्धार्थ चांदेकरची पोस्ट चर्चेत

चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( siddharth chandekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. पत्नी मितालीसोबत फनी व्हिडिओ अकतील फोटो देखील शेअर करत असतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी- चॉकलेट बॉय अभिनेता सिद्धार्थ चांदेकर ( siddharth chandekar ) सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. पत्नी मितालीसोबत फनी व्हिडिओ असतील  किंवा फोटो देखील शेअर करत असतो. यासोबतच त्याच्या कामाबद्दल अपडेटस देखील देत असतो. पण आता त्याने एक अशी पोस्ट केली आहे ज्यामुळे तो चर्चेत आला आहे. नेमकी ही  ( siddharth chandekar latest post )  पोस्ट काशासाठी आहे आणि कुणाबद्दल आहे याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगलेली आहे. सिद्धार्थने इन्स्टा पोस्ट करत म्हटलं आहे की, मला नाही माहित, मला नाही येत. मला नाही जमत. हे म्हणायला किती धाडस लागतं. मी कुणीतरी आहे इतरांना सांगण्याच्या अट्टाहासात मी आहे हे स्वत:ला कधी सांगणार “, मी मीच आहे, असं कॅप्शन सिध्दार्थने दिलं आहे. सिध्दार्थच्या या वैचारीक पोस्टची बरीच चर्चा रंगली आहे. नेटक-यांनी त्याच्या या विचारांचं कौतुक केलं आहे.

जाहिरात

मूळचा पुण्याच्या असलेल्या सिद्धार्थ चांदेकरचा जन्म 14 जुन 1991 रोजी झाला. त्याचे प्राथमिक शिक्षण पुण्यातील एस डी कटारिया हायस्कूलमधून तर त्यापुढील शिक्षण सर परशुराम कॉलेज येथून झाले. सिद्धार्थच्या आईचे नाव सीमा चांदेकर असून त्या मराठी चित्रपट, रंगभूमीवरील अभिनेत्री आहेत. अनेक नाटकांमध्ये त्यांनी अभिनय केला आहे. वाचा- Bappi Lahiri पंचत्त्वात विलीन, मुंबईतील विले-पार्लेमध्ये झाले अंत्यंसंस्कार सिद्धार्थने 2008मध्ये ‘अग्निहोत्र ‘या मालिकेत ‘नील’ची भूमिका साकारली होती. या मालिकेमुळे त्याला चांगलीच प्रसिद्धी मिळाली.  याशिवाय तो कशाला उद्याची बात, मधू इथे आणि चंद्र तिथे , प्रेम हे या मालिकांमध्येही झळकला.  यासोबतच त्याने अनेक मराठी सिनेमात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2010मध्ये आलेल्या अवधूत गुप्तेच्या “झेंडा” या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत त्याने पहिले पाऊल टाकले. ‘क्लासमेट ‘ या ब्लॉकबस्टर चित्रपटातील त्याच्या भूमिकेमुळे प्रेक्षकांकडून त्याला चांगलीच दाद मिळाली. पिंडदान, बालगंधर्व, सतरंगि रे, संशयकल्लोळ, वजनदार,ऑनलाईन बिनलाईन, लॉस्ट अँड फाउंड, बस स्टॉप, गुलाबजाम, वजनदार या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. नुकताच आलेला त्याचा झिम्मा हा सिनेमा तुफान गाजला आणि गाजत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात