जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bappi Lahiri पंचत्त्वात विलीन, मुंबईतील विले-पार्लेमध्ये झाले अंत्यंसंस्कार

Bappi Lahiri पंचत्त्वात विलीन, मुंबईतील विले-पार्लेमध्ये झाले अंत्यंसंस्कार

Bappi Lahiri पंचत्त्वात विलीन, मुंबईतील विले-पार्लेमध्ये झाले अंत्यंसंस्कार

बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांच्या पार्थिवावर मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले परिसरातील पवन हंस घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 17 फेब्रुवारी- बप्पी लहिरी   (Bappi Lahiri)  यांच्या पार्थिवावर मुंबईतील (Mumbai) विलेपार्ले परिसरातील पवन हंस घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याठिकाणी उपस्थित बॉलिवूड कलाकार आणि चाहत्यांनी जड अंतःकरणाने दिग्गज गायक-संगीतकार बप्पी दा यांना निरोप दिला. आपल्या सर्वांचे लाडके बप्पी दा आता पंचतत्वात विलीन झाले आहेत. त्यांचा मुलगा बप्पा लाहिरी यांनी त्यांना भावुक मनाने रडत-रडत मुखाग्नी दिली. गायक आणि संगीतकार बप्पी लहरी (Bappi Lahiri death) यांच्या निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. बप्पी दा यांनी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते गेल्या काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होते. रुग्णालयातील डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्यांना गेल्या एक वर्षांपासून ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप ऍप्निया (Obstructive Sleep Apnea) आणि छातीत संसर्गाची समस्या होती. हा आजार त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. बप्पी दा यांचं काल निधन झालं होतं. परंतु त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. कारण बप्पी दा यांचा मुलगा बप्पा लहिरी आपल्या कुटुंबासह अमेरिकेत वास्तव्यास आहे. त्यांच्या येण्याची प्रतीक्षा केली जात होती. ते आज आल्यानंतर बप्पी दा यांना मुखाग्नी देण्यात आली. बप्पी दा यांचे पार्थिव लाहिरी हाऊस ते पवन हंस घाटापर्यंत फुलांनी सजवलेल्या ट्रकवर अंत्यसंस्कारासाठी आणण्यात आले. अंत्ययात्रेदरम्यान, चाहत्यांनी त्यांच्या आवडत्या गायकाला श्रद्धांजली वाहण्यासाठी मोठमोठ्या रांगा लावल्या होत्या. बप्पी दा यांचा मुलगा, नातू स्वस्तिक बन्सल, मुलगी आणि जावई खूपच भावूक दिसत होते. सुप्रसिद्ध रॅपर आणि गायक बनलेल्या स्वस्तिकने अतिशय भावूक होत मीडियाला सांगितलं की, ‘आजचा दिवस आमच्यासाठी खूप दुःखाचा आहे. माझे आजोबा आता या जगात नाहीत . त्यांनी मला संगीतासाठी तयार केले आणि त्यांनीच मला पहिला शब्द शिकवला. मी आज जर गायक आहे तर ते फक्त त्यांच्यामुळेच. मी त्यांच्यावर मनापासून प्रेम करतो आणि नेहमीच करेन.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात