जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Shreyas Talpade Exclusive: एकेकाळी बाप्पावर रागवलेला श्रेयस आता 'या' कारणामुळे करत नाही गणपतीचं विसर्जन

Shreyas Talpade Exclusive: एकेकाळी बाप्पावर रागवलेला श्रेयस आता 'या' कारणामुळे करत नाही गणपतीचं विसर्जन

Shreyas Talpade Exclusive: एकेकाळी बाप्पावर रागवलेला श्रेयस आता 'या' कारणामुळे करत नाही गणपतीचं विसर्जन

अभिनेता श्रेयसच्या आयुष्यातील बाप्पाच्या आठवणी त्यानं न्यूज 18 लोकमतच्या ‘बाप्पा विथ गप्पा’ या कार्यक्रमात सांगितल्या. श्रेयस घरच्या बाप्पाचं विसर्जन का करत यामागचं कारण त्यांनं सांगितलं.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 07 सप्टेंबर : बॉलिवूड तसेच मराठी सिनेमांमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करणारा. मध्यंतरी पुष्पाच्या आवाजानं सर्वांचं लक्ष वेधणारा सर्वांचा लाडका अभिनेता श्रेयस तळपदे सध्या माझी तुझी रेशीमगाठ मालिकेत यशची भूमिका साकारत आहे. या निमित्तानं अनेक वर्षांनी श्रेयस टेलिव्हिजनवर परतला आहे. श्रेयस तळपदेनं न्यूज 18 लोकमतच्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कार्यलयात भेट दिली. श्रेयसच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली . प्रत्येकाच्या आयुष्यात बाप्पांचं अढळ स्थान आहे. अभिनेता श्रेयसच्या आयुष्यातील बाप्पाच्या आठवणी त्यानं न्यूज 18 लोकमतच्या ‘बाप्पा विथ गप्पा’ या कार्यक्रमात सांगितल्या. अभिनेता श्रेयस तळपदेच्या घरी बाप्पांचं आगमन होतं. पण श्रेयस बाप्पांचं विसर्जन मात्र करत नाही. श्रेयस असं का करतो याचं कारण त्यानं सांगितलं.  त्याचप्रमाणे त्यांच्या अभिनय कारकिर्दीविषयी मनमोकळ्या गप्पा देखील मारल्या. हेही वाचा - Prasad Oak Exclusive : ‘पुस्तकाचा राजकारणाशी काहीही संबंध नाही’; ‘माझा आनंद’बाबत प्रसाद ओकचं मोठं वक्तव्य एकेकाळी बाप्पावर प्रचंड चिडला होता श्रेयस बाप्पाच्या आठवणी सांगत श्रेयस म्हणाला, ‘मी नवीन घर घेतलं तेव्हा आम्ही ठरवलं की घरी बाप्पाचं आगमन करायचं. आम्ही सलग सात वर्ष दीड दिवसांचे बाप्पा घरी आणले. मधल्या काळात माझे बाबा वारले.  तेव्हा मी फार चिडलो होतो. ज्या पद्धतीनं सगळं झालं ते माझ्यासाठी फार धक्कादायक होतं त्यामुळे मी चिडून घरी सांगितलं यापुढे घरी गणपती बसवायचा नाही.  मी चिडलो आणि आता थांबायचं असं ठरवलं.   त्यानंतर मला मुलगी झाली. मग ती म्हणाली आपण बाप्पांना घरी आणूया का? तिच्या म्हणण्यानुसार आम्ही मागच्या वर्षीपासून घरी बाप्पांना पुन्हा आणायला सुरुवात केली’. हेही वाचा - Myra Vaikul: मायराचा आत्तापर्यंत न पाहिलेला क्युट फोटो आला समोर, सध्या आहे छोटी सुपस्टार

श्रेयसच्या घरी होत नाही बाप्पाचं विसर्जन श्रेयसच्या घरच्या बाप्पांचं खास वैशिष्ट्य असं आहे की श्रेयस त्याच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करत नाही. याचं कारण सांगताना श्रेयस म्हणाला, ‘मुलगी झाल्यानंतर आम्ही पहिल्यांदा बाप्पा आणला.आमच्या बाप्पाचं विसर्जन करण्याच्या काही वेळ आधी  मुलीनं शेजाऱ्यांच्या बाप्पाचं विसर्जन पाहिलं. आम्ही इकडे बाप्पाचं विसर्जन करण्यासाठी हौद तयार केला होता. पण ती आली आणि म्हणाली, डॅडा आपण बाप्पाचं विसर्जन करायचं नाही.  आम्ही तिला समजावलं पण तिनं तेव्हा इतका गोंधळ घातला की शेवटी आम्ही ठरवलं की बाप्पाचं विसर्जन नाही करायचं’. लेकीच्या हट्टापाय श्रेयस त्याच्या घरच्या बाप्पाचं विसर्जन करत नाही. विसर्जनाच्या दिवशी बाप्पांच्या पायाला माती लावून त्या मातीचं विसर्जन केलं जातं आणि मुर्ती घरीच ठेवली जाते.  त्या मुर्तीला दरवर्षी रंगरंगोटी करुन पुन्हा त्याच मुर्तीची पूजा केली जाते असं श्रेयस म्हणाला. इतकंच नाही तर श्रेयसचं लेक घरी ठेवलेल्या त्या बाप्पाला दररोज ‘गुड मॉर्निंग, बाप्पा गुड नाइट बाप्पा; म्हणते, असंही श्रेयसनं सांगितलं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात