मुंबई, 16 नोव्हेंबर- महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमामुळे समीर चौगुलेंनी (Samir Choughule) प्रत्येकाच्या मनात स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या या यशाचा मागे त्यांच्या सहचारिणीचा खुप मोठा वाटा आहे. म्हणतात ना प्रत्येक यशस्वी पुरूषामागे एक स्त्री असते. अगदी त्याचप्रमाणे समीर यांची पत्नी नेहमी त्याच्या मागे खंबीरपणे उभी असते. म्हणूनच आज लग्नाच्या 24 व्या वाढदिवसानिमित्त त्यांनी पत्नीसाठी खास (sameer chougule wife kavita) पोस्ट शेअर केली आहे.
समीर चौगुले यांनी पत्नीसोबतचा फोटो शेअर करत म्हटले आहे की," सह जीवनाची 24 वर्षे ..स्ट्रगलच्या काळात "मी आहे नको काळजी करुस" असं खंबीरपणे म्हणणारी आणि किंचित यशाने हुरळून जाऊन माझी पतंग हवेत उडायला लागल्यावर "जरा थांब" म्हणून मला जमिनीवर उतरवणारी....A Big Thank You आणि खूप प्रेम" समीर यांच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळीकडून शेभेच्छांचा वर्षाव होत आहे. यापूर्वीही समीर यांनी पत्नीसाठी अशा पोस्ट लिहिल्या आहेत. त्यांच्या पत्नीच नाव कविता आहे.
वाचा : Bigg Boss 15: टास्क दरम्यान VIP गटात पडली फूट; आपापसांत भांडताना दिसले उमर-करण
विनोदांचं अचूक टाईमिंग साधत हास्यजत्रेच्या स्टेजवर नुसता धुमाकूळ घालणारे प्रसिध्द अभिनेते म्हणजेच समीर चौगुले होय. समीर हे एक उत्कृष्ट लेखकसुध्दा आहेत. छोट्या पडद्यावरील विविध मालिका,सिनेमे, नाटक आणि कॉमेडी शोच्या माध्यमातून समीर यांनी रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. 'फू बाई फू', कॉमेडीची बुलेट ट्रेन या कार्यक्रमांमधून समीर चौगुले हे नाव घराघरांत पोहचलं. आता महाराष्ट्राची हास्यजत्रेच्या माध्यमातून त्यांनी रसिकांच्या हदयात स्थान मिळवलं.
View this post on Instagram
अभिनेते समीर चौगुले हे आपल्या विनोदबुद्धीच्या जोरावर कायमच प्रेक्षकांचं मनोरंजन करत असतात. त्यामुळे सोशल मीडियावर अनेकदा त्याची चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे पडद्यावर वावरणारा हा कलाकार खऱ्या आयुष्यातही अत्यंत साधा आहे. त्यामुळे त्यांच्या याच साधेपणामुळे त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.