मुंबई, 16 नोव्हेंबर- बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या घरात सध्या चांगलाच गोंधळ सुरू आहे. घरात नेहमीच दोन गट पडत असले तरी यावेळी बिग बॉसने व्हीआयपी (VIP) आणि सामान्य सदस्यांचा टॅग देऊन थेट घरात दोन आखाडे तयार केले आहेत. एका बाजूला करण कुंद्रा (Karan Kundra), तेजस्वी प्रकाश, विशाल कोटियन, निशांत भट्ट आणि उमर रियाझ (Umar Riaz) हे व्हीआयपी सदस्य बनून ट्रॉफीचे हक्कदार बनले आहेत. तर दुसरीकडे नेहा भसीन, प्रतीक सहेजपाल, शमिता शेट्टी, राजीव अदातिया, जय भानुशाली आणि सिम्बा आहेत ज्यांना अद्याप व्हीआयपी तिकिटे मिळालेलं नाही.आतापर्यंत व्हीआयपी सदस्य खूप आनंदी आणि एकजूट दिसत होते. परंतु आता बिग बॉसच्या नवीन टास्कने या सर्वांमध्ये चुरस निर्माण केली आहे.
View this post on Instagram
बिग बॉसच्या नवीन प्रोमोमध्ये नवीन टास्कमुळे व्हीआयपी सदस्यांमध्ये जोरदार वादावादी होणार असल्याचे समोर आले आहे. इतकेच नाही तर करण कुंद्राला कधीही प्रश्न न विचारणारा आणि अनेकदा त्याच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देणारा उमर रियाझही टास्कमुळे करणवर रागावताना दिसणार आहे. दुसरीकडे, करण, जो खूपच कमी चिडतो. तो उमरच्या या कृतीवर चिडून टेबलावर लाथ मारताना दिसत आहे.
Umar Riaz looses his temper on fellow VIP contestants. Is this going to change the dynamics of the house going forward? Watch Bigg Boss 15 tonight at 10:30pm only on COLORS! @justvoot @ColorsTV pic.twitter.com/B3XgLtvWvq
— Deepika Sharma (@IamDpika) November 16, 2021
वास्तविक, बिग बॉसने घराची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी व्हीआयपी सदस्यांना दिली आहे. या कार्यादरम्यान, आता व्हीआयपी सदस्य घरातील कोणतेही काम करू शकत नाहीत आणि त्यांना घरातील सर्व कामे नॉन-व्हीआयपी सदस्यांकडूनच करून घ्यावी लागतील. अशा स्थितीत व्हीआयपी सदस्यांमध्ये त्यांची वैयक्तिक कामे बिगर व्हीआयपी सदस्यांकडून करून घेणार की नाही, अशी चर्चा सुरू होती. निशांत भट्ट या मुद्द्यावरून बाकीच्या सदस्यांपासून वेगळे होताना दिसले आणि मी स्वत: भांडी धुवणार असे म्हणत. तर करण कुंद्रा व्हीआयपी सदस्यांना समजावून सांगताना दिसला की, जर आम्ही आमचे काम स्वत: केले तर तो नॉन-व्हीआयपी सदस्यांचा विजय असेल.
नवीन प्रोमोमध्ये असे समोर आले आहे की, घर चालवण्यात गुंतलेले व्हीआयपी सदस्य स्वतःच्या इच्छेनुसार चालवताना दिसत आहेत. जिथे नेहा रेशन टास्कच्या मध्यभागी बोलल्याबद्दल तेजस्वीला मूर्ख म्हणताना दिसते. त्याच वेळी, जेव्हा व्हीआयपी सदस्यांना एखाद्या कार्यादरम्यान प्रश्न विचारण्याची जबाबदारी दिली जाते तेव्हा उमर यांना प्रश्न विचारण्याची परवानगी का दिली जात नाही याचा राग येतो. त्याचा प्रश्न अनावश्यक आहे का, असे उमर म्हणताना दिसत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Entertainment