**मुंबई, 12 एप्रिल- ‘**चला हवा येऊ द्या’ (Chala Hawa Yeu Dya) च्या मंचावरून घराघरांत लोकप्रिय झालेले नाव म्हणजे कुशल बद्रिके (Kushal Badrike) . विनोदाचा बादशाह, हुकमी एक्का अशी त्याची ओळख सांगितली जाते. कुशल बद्रिके हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतो. अनेकदा तो त्याच्या आगामी नाटकांची, चित्रपटांची माहिती सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतो. कुशलनं नुकतीच (Kushal Badrike ) त्याच्या कुटुंबाविषयी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. सध्या त्याची हो पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. कुशल बद्रिकेने इन्स्टावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्याची पत्नी तले विजू माने व इतर काही मंडळी दिसत आहेत. हा फोटो पोस्ट करत त्याने म्हटलं आहे की, आपल्याला काय हवं असतं आयुष्यात ? एक कुटूंब, ज्यांना तुमच्या आनंदात आनंद मिळतो, तुमच्या उत्कर्षात त्यांना अभिमान वाटतो. त्यांच्या नुसतं सोबत असण्याचाही आपल्याला आधार वाटतो.अशी ही माझी family ❤️❤️❤️ त्याच्या या पोस्टनं चाहत्यांचे मन जिंकल आहे. अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत प्रेम व्यक्त केलं आहे. वाचा- ‘आता तुमचा निरोप घेतो’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील अभिनेत्याची पोस्ट चर्चेत कुशल नेहमीच सोशल मीडियावर त्याच्या मुलाचं असेल किंवा मित्र परिवाराचे कौतुक करताना दिसतो. ज्याप्रमाणे त्याचा प्रचंड चाहता वर्ग आहे त्याप्रमाणे मित्र परिवार देखील मोठा आहे. मराठी मनोरंजन विश्वातील अनेक सेलेब्स देखील कुशलच्या मैत्रीचे कौतुक करताना दिसतो. नुकतीच त्याने त्याच्या मुलांबद्दल एक इन्स्टा पोस्ट केली होती ज्यामुळे तो चर्चेत आला होता. कुशलने आपल्या दोन्ही मुलांसोबत एक फोटो शेअर करत म्हटले होते की, ‘माय प्राईड’. प्रत्येक आई वडिलांचा त्यांची मुलं ही अभिमान असतात. अगदी कुशलनं देखील या पोस्टमधून माझी मुलं ही माझा अभिमान असल्याचे सांगायचे आहे असेच दिसत होते.
कुशल बद्रिके सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय आहे. नेहमी तो भन्नाट व्हिडिओ शेअर करत असतो. पांडू सिनेमाच्या सेटवरली देखील त्याने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. शिवाय तो चला हला येऊ द्याच्या सेटवरून कधी भाऊ कदम तर कधी श्रेया बुगडेसोबत व्हिडिओ शेअर करत असतो. त्याचा सोशल मीडियावर एक वेगळा चाहता वर्ग आहे.तसेच कुशल सध्या चित्रपटांमध्येसुद्धा व्यग्र आहे. तो लवकरच ‘जत्रा 2’ मध्ये धम्माल करताना दिसणार आहे.